Poultry Industry Agrowon
ताज्या बातम्या

Poultry Industry In Maharashtra : कुक्‍कुट समन्वय समिती कुचकामी

Poultry Industry : पोल्ट्री व्यवसायाशी संबंधित अडचणींच्या सोडवणुकीसाठी पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने राज्यस्तरीय कुक्‍कुट समन्वय समितीचे गठण करण्यात आले.

Team Agrowon

Nagpur News : पोल्ट्री व्यवसायाशी संबंधित अडचणींच्या सोडवणुकीसाठी पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने राज्यस्तरीय कुक्‍कुट समन्वय समितीचे गठण करण्यात आले.

आजवर या समितीच्या तीन बैठकाही झाल्या. परंतु एकाही समस्येचे निराकरण गेल्या वर्षभरात झाले नाही. परिणामी ही समिती असून अडचण नसून खोळंबा अशी ठरत असल्याचा आरोप पशुपालकांनी केला आहे.

राज्यात सुमारे चार लाखावर पोल्ट्री व्यावसायिक आहेत. नजीकच्या काळात यामध्ये करारावर हा व्यवसाय करणाऱ्या कुक्‍कुटपालकांची संख्या वाढली आहे. त्यासोबतच कंपन्यांची मनमानी देखील वाढली आहे. दरात चढउताराचे नियंत्रण कंपन्यांकडून होते, असा आरोप पशुपालक सातत्याने करतात.

या व्यवसायातील अडचणी सोडविण्यासाठी राज्यस्तरीय कुक्‍कुट समन्वय समितीचे गठण २१ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या शासन आदेशान्वये करण्यात आले. त्यानंतर २५ जानेवारी, १३ एप्रिल, १९ जून २०२३ याप्रमाणे समितीच्या बैठकाही झाल्या आहेत.

परंतु चर्चेशिवाय या बैठकांतून पशुपालकांच्या हाती काहीच लागले नाही, असा आरोप आहे. या महिन्यात मंगळवारी (ता.५) समितीची बैठक होईल. त्यामध्ये देखील प्रलंबित मुद्यांवरच चर्चा होईल.

...अशा आहेत मागण्या

वीजबिल सवलत किंवा कृषिपंपाचा दर आकारावा. केंद्र शासनाच्या करार पोल्ट्री व्यवसायाशी संबंधित गाईडलाईनची अंमलबजावणी. नैसर्गिक आपत्तीत दगावणाऱ्या कुक्‍कुटपक्ष्यांच्या भरपाईत वाढ करावी.

कुक्‍कुटपालनासाठीचे क्षेत्र अकृषिक मानून त्यावर मनमानी कर आकारणी ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्थांकडून होते. असे क्षेत्र कृषक क्षेत्र समजावे. किमान वेतन कायद्याखाली कुक्‍कुटपालन हा स्वतंत्र उद्योग न समजता शेती समजावा.

राज्यातील या क्षेत्राशी संबंधित कुक्‍कुटपालक व्यवसायिकांना दिलासा मिळावा, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी सातत्याने आम्ही समिती सदस्य म्हणून शासनस्तरावर बैठकीच्या माध्यमातून अडचणी मांडत आहोत. शासनाने देखील त्याची गांभीर्याने दखल घेत सोडवणुकीसाठी प्रयत्न करावेत.
- शुभम महाले, सदस्य, राज्यस्तरीय कुक्‍कुट समन्वय समिती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Price Issue: कापसाचे दर पडण्यास शासन जबाबदार

Banana Price: गुणवत्ता निकषावर मालाला मिळणार दर

Agriculture Technology: नव्या तंत्रज्ञानामुळे देशात कृषी क्षेत्रात क्रांती

Global Sugar Production: जागतिक बाजारात साखर पुरवठा वाढणार

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

SCROLL FOR NEXT