Weather Update
Weather Update  Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता कायम

टीम ॲग्रोवन

राज्यासह देशाच्या विविध भागात पावसाचे (Rainfall) पुनरागमन झाल्याने मॉन्सूनचा परतीचा प्रवास (Monsoon Return Journey) पुन्हा काहीसा अडळला आहे. आज (ता. ९) राज्यात सर्वदूर हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज (Rain Forecast) कायम आहे. तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यताही (Rain Forecast With Lightning) हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

संपूर्ण वायव्य भारतातून ३ ऑक्टोबर रोजी मॉन्सून परतला. त्यानंतर मात्र परतीच्या वाटचालीत मॉन्सूनची उत्तरकशी, नाझियाबाद, आग्रा, ग्वालियर, रतलाम, भारूच पर्यंतची सीमा शनिवारी (ता. ८) कायम आहे. उत्तर महाराष्ट्र आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय असून, त्यापासून राजस्थान हरियाणा ते पंजाब पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून १.५ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.

कोकण, मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान असून, राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाच्या सरी सुरूच होत्या. पावसाची हजेरी, ढगाळ आकाशामुळे गेली तीन दिवसांपासून कमाल तापमानात घट झाली आहे. आज (ता. ९) राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.

मुंबई, रायगड, ठाण्यासह उत्तर कोकणात शुक्रवारी (ता. ७)दमदार पाऊस झाला. शनिवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अनेक ठिकाणी १०० मिलीमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद होत अतिवृष्टी झाली. रायगडमधील मुरूड येथे १६० तर पनवेल येथे १४० मिलीमीटर पाऊस पडला. उत्तर महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार, तर मराठवाडा, विदर्भात हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

SCROLL FOR NEXT