Rain Update : हिंगोली, परभणी जिल्ह्यांतील ८२ मंडलांत पाऊस

हिंगोली जिल्ह्यातील ३० मंडलांत हलका ते जोरदार पाऊस झाला. औंढा नागनाथ तालुक्यातील मंडलात पावसाचा जोर होता.
Rainfall
RainfallAgrowon

हिंगोली ः हिंगोली, परभणी (Hingoli, Parbhani Rainfall) जिल्ह्यांतील ८२ मंडलांत शुक्रवारी (ता. ७) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत हलका ते जोरदार पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील ३० मंडलांत हलका ते जोरदार पाऊस झाला. औंढा नागनाथ (Aundha Nagnath Rainfall) तालुक्यातील मंडलात पावसाचा जोर होता.

Rainfall
Rain Update : साठ मंडलांत पावसाची जोरदार हजेरी

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ११.९ मिमी, ऑक्टोबर महिन्यात ५४.५ मिमी, तर १ जूनपासून एकूण सरासरी ९४०.१ मिमी पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील ५२ मंडलांत हलका ते जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ६.५ मिमी, ऑक्टोबर महिन्यात २१.९ मिमी, तर १ जूनपासून एकूण सरासरी ६७२.३ मिमी पाऊस झाला.

मंडलनिहाय पाऊस (मिमीमध्ये)

हिंगोली जिल्हा ः हिंगोली ९.८, नरसी नामदेव १०.३, बासंबा १२.३, डिग्रस कऱ्हाळे ६.८, कळमनुरी १३, वाकोडी १२.५, नांदापूर १८.८, आखाडा बाळापूर २८, डोंगरकडा ६, वारंगा ७.३, वसमत २१.३, आंबा ५.५, हयातनगर २३.३, गिरगाव ७, हट्टा ६.५, टेंभुर्णी ११, कुरुंदा ७, औंढा नागनाथ ५०.८, येळेगाव ५.३, साळणा २९.३, सेनगाव १३.३, आजेगाव ६.३, पानकन्हेरगाव १२, हत्ता १३.

परभणी जिल्हा ः परभणी ९.३, परभणी ग्रामीण ६.५, जांब ८.८, झरी ९.३, टाकळी कुंभकर्ण ६.५, सावंगी म्हाळसा १३.८, बामणी ९, बोरी १९.८, आडगाव २९.३, चारठाणा ५.३, वाघी धानोरा ५.३, दूधगाव ९.३, वालूर १२.८, कुपटा ८.८, मोरेगाव ६.५, केकरजवळा ९.५, रामपुरी ७.३, पाथरी ५.३, बाभळगाव १६.३, पालम ६.८, पेठशिवणी १४.८, रावराजूर ७, पूर्णा ५.८, कात्नेश्‍वर ५.३, चुडावा १६.३.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com