Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Rain Update : नागपूर शहर जिल्ह्यात गुरुवारी (ता. १६) सायंकाळच्या सुमारास जोरदार वादळी पाऊस बरसल्याने पुन्हा नागपूरकरांची दाणादाण उडाली.
Heavy Rain
Heavy RainAgrowon

Nagpur News : नागपूर शहर जिल्ह्यात गुरुवारी (ता. १६) सायंकाळच्या सुमारास जोरदार वादळी पाऊस बरसल्याने पुन्हा नागपूरकरांची दाणादाण उडाली. वादळामुळे अनेक भागांत झाडे कोसळल्याने वाहतूक खोळंबली. तर काही भागांत बत्ती गूल झाल्याने नागरिकांना अंधारात राहावे लागले.

नागपूर व विदर्भात जवळपास आठ-दहा दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे उन्हाचे चटके कमी झाले. गेल्या गुरुवारी गुरुवारी विजांसह बरसलेल्या धो-धो पावसानंतर शहरात पावसाचा थेंबही पडला नाही. गुरुवारी (ता.१६) सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. मात्र सायंकाळ होताच वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. पाचच्या सुमारास वादळ सुटल्यानंतर अनेक भागांत सरी कोसळल्या. तर काही भागांत वादळाने जोरदार तडाखा दिला.

Heavy Rain
Summer Heat : उन्हामुळे केळी, भाजीपाल्याला फटका

पूर्व, उत्तर नागपुरात झाडे कोसळली

वादळामुळे पूर्व व उत्तर नागपुरातील लकडगंज, छापरूनगर, हज हाऊस भवन, सक्करदरा, महाकालीनगर, मानेवाडा, हुडकेश्वरसह आजूबाजूच्या परिसरातील अनेक भागांत झाडे व फांद्या वर्दळीच्या रस्त्यांवर पडल्याने या परिसरातील वाहतूक खोळंबली.

Heavy Rain
Summer Heat : कोल्हापुरात भाजीपाला पट्टा हतबल

वादळवाऱ्यांमुळे दुचाकी व चारचाकी वाहनांचीदेखील मोडतोड झाली. शिवाय काही भागांत बत्ती गूल झाल्याने नागरिकांना बराच वेळपर्यंत अंधारात राहावे लागले. तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मनपाच्या अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून रस्त्यांवरील झाडे व फांद्या कापून रस्ते मोकळे केले.

ढगाळ वातावरणानंतरही विदर्भातील कमाल तापमानात आश्चर्यकारकरीत्या वाढ झाल्याचे दिसून आले. बुधवारच्या तुलनेत नागपूरच्या तापमानात २.६ अंशांची वाढ होऊन पारा ३८.८ अंशांवर गेला. तर अकोला (४२.४ अंश सेल्सिअस) पुन्हा विदर्भात हॉट राहिले. विदर्भात गडचिरोली येथेही जोरदार पाऊस झाल्याचे वृत्त आहे. येथे गुरुवारी सायंकाळी साडेपाचपर्यंतच्या चोवीस तासांत तब्बल ३७.६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com