Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

Parbhani Water Crisis : परभणी जिल्ह्यातील जिंतूर आणि सेलू तालूक्याला सध्या पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जिंतूर तालुक्यात जलसंकटाची छाया गडद झाली आहे. तर सेलू तालूक्याला पशूधनासह शेतीसाठी आवर्तन सोडले जाणार आहे.
Water Crisis
Water CrisisAgrowon
Published on
Updated on

Pune News : परभणी जिल्ह्यातील विविध भागाला सध्या पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. येथील येलदरी धरणात फक्त २९.२८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तर लोअर दुधना प्रकल्पात केवळ ०.९३ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे दोन्ही धरणाच्या क्षेत्रात येणाऱ्या टप्पा सध्या जलसंकटाची छाया गडद होत आहे. यामुळे तालुक्यात पाणीपुरवठ्याची मागणी वाढली आहे. तर सेलू तालूक्यातील गावांना प्रशासनाकडून धीर देण्यात आला आहे. येथे लोअर दुधना प्रकल्पातून दुधना नदीपात्रात दोन दिवसांत पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे नदीकाठच्या गावांमधील पाणीटंचाई मार्गी लागणार आहे.

जिंतूरमधील २२ लघु प्रकल्प कोरडेठाक

जिंतूरमधील २३ लघु सिंचन प्रकल्पांपैकी भिलज तलवात २५ टक्के पाणीसाठा शिल्लक असून २२ लघु प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. तर येथील प्रमुख असणाऱ्या येलदरी धरणात फक्त २९.२८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तर करपरा प्रकल्पातील पाणीसाठा शून्य टक्क्यावर आला आहे. यामुळे जिंतूर तालुक्यात दिवसेंदिवस जलसंकट गडद होत आहे.

Water Crisis
Water Crisis : सिंदखेडराजा तालुक्यातील तीन गावांची टँकरने भागतेय तहान

जिंतूर तालुक्यातील पूर्णा नदीवरील येलदरी धरण मोठे असून येथील धरणावर जलविद्युत निर्मितीसह हजारो हेक्टर क्षेत्रावर सिंचन व्यवस्था चालते. तर या धरणावर जिंतूरसह परभणी हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील शेकडो गावांची तहान भागते. मात्र यंदा धरणाच्या जलाशयात चांगलीत घट झाली आहे. बुधवारी (१५ मे) रोजीच्या आकडेवारीनुसार जलाशयात २९.२८ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता.

या खालोखाल निवळी (खूर्द) येथील करपरा मध्यम प्रकल्पांवर अवलंबून असणाऱ्या बाराशे हेक्टरवरील पिकांच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. करपरा प्रकल्पातील पाणी साठा शून्य टक्क्यांच्या खाली गेला असून येथे ०.०२७ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे.

Water Crisis
Water Crisis : नाशिक विभागावर पाणी संकट; धरणातील पाणीसाठा आला २८ टक्क्यांवर; १२ मे पर्यंत अर्ज केल्यास मिळणार आवर्तन

पाणीटंचाईच्या समस्येवर जिल्हाधिकाऱ्यांनी लोअर दुधना प्रकल्पाच्या विभागीय अभियंता यांना कळवले होते. यावरून सांडव्याद्वारे नदीपात्रात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच हे पाणी पशूधन आणि लोकांना पिण्यासाठी असून ते शेतीसाठी वापरू नये असे अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

धरणात किती पाणीसाठा

लोअर दुधना प्रकल्पात केवळ ०.९३ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक असून येथील पाणी जालन्यातील परतूर, मंठा शहरासह वॉटर ग्रीड योजनेतील गावांनासह सेलू शहराला दिले जाते. मात्र सध्या धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने तिन्ही शहरांसह योजनेतील गावांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

दरम्यान तहसिलदार दिनेश झांपले यांनी नदी पात्रात पाणी सोडण्याबाबत कोणतेच आदेश मिळालेले नसल्याचे सांगितले आहे. तर याबाबत फक्त सूचना पत्राद्वारे जिल्हाधिकारी यांनी दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com