Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water issue : मुसळधार पाऊस पडूनही महाड तालुका तहानलेलाच असून पाणीटंचाईने उग्ररूप धारण केले आहे. सध्या तालुक्यात १२ गावे व १०७ वाड्यांना नऊ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
Water Shortage
Water ShortageAgrowon

Mahad News : मुसळधार पाऊस पडूनही महाड तालुका तहानलेलाच असून पाणीटंचाईने उग्ररूप धारण केले आहे. सध्या तालुक्यात १२ गावे व १०७ वाड्यांना नऊ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. प्रचंड उष्‍मा व त्यातच तीव्र पाणीटंचाईमुळे गावी येणाऱ्या चाकरमान्यांचे प्रमाणही यंदा कमी झाले आहे.

दहा वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्याचा प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. येत्या काही दिवसांत पाणीटंचाईचे सावट आणखी गडद होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

Water Shortage
Water Storage : चिंताजनक! देशातील प्रमुख जलाशयांमध्ये केवळ २५% पाणीसाठा, राज्याचीही स्थिती बिकट

महाड तालुक्यात १९६ गावे तर ५०० हून अधिक वाड्या आहेत. यातील बहुतांशी गावे-वाड्या डोंगराळ भागात असल्याने त्यांना दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. पाणीपुरवठ्याच्या अनेक योजना राबवूनही ही गावे एप्रिल व मेमध्ये तहानलेली असतात.

नद्या, नाले व विहिरीतील पाणी आटत असल्याने बहुतांश योजना कुचकामी ठरत असल्‍याने ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा हा एकमेव आधार आहे. या वर्षी तालुक्यात १२ गावे व १०७ वाड्यांना नऊ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. ग्रामीण भागात दिवसेंदिवस पाणीटंचाई रौद्ररूप धारण करू लागल्‍याने आणखी १० वाड्यांनी टँकरची मागणी केली आहे.

Water Shortage
Water Scarcity : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४१२ गावांना ६७८ टॅंकर्सद्वारे पाणीपुरवठा

धरणांची कामे रखडली

महाड तालुक्यात सद्यःस्थितीत काळ नदीवरील जलविद्युत प्रकल्प, नागेश्वरी नदीवरील आंबिवली धरण, कोथेरी धरणाचे कामे अद्याप पूर्णत्वास आलेली नाही तर दासगाव, भावे या ठिकाणी धरणे बांधण्याचा प्रस्तावच कागदावर आहेत. किंजळोली या ठिकाणी लघुसिंचन प्रकल्पांचे सर्वेक्षणही झालेले आहे. परंतु यावरही कार्यवाही झालेली नाही. काळ जलविद्युत प्रकल्पाअंतर्गत गांधारी नदीवरील वाळसुरे येथे सिंचन बंधाराही यामुळे रखडला आहे.

उपाययोजनांची गरज

भौगोलिकदृष्‍ट्या महाड तालुका डोंगराळ व दुर्गम आहे. त्यामुळे डोंगर-दऱ्यातील पाणी वाहून त्याचा त्वरित निचरा होतो. बहुसंख्य गावांना पाणी योजनांवर अवलंबून राहावे लागते. परंतु उन्हाळ्यात पाणी पातळीच खालावत असल्‍याने योजनेचा बोजवारा उडतो. तालुक्‍यात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ उपक्रम गरजेचे आहेत. वनराई बंधारे यासाठी उपयुक्त असून श्रमदानातून बंधाऱ्यांकरिता ग्रामस्थांना प्रवृत्त करणे गरजेचे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com