Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

राज्यातील एकूण २४ जिल्ह्यांत जून महिन्यात पावसाची कमतरता दिसून आली. चोवीस पैकी ३ जिल्ह्यांत अत्यंत कमी, तर २१ जिल्ह्यांत त्या त्या जिल्ह्याच्या सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचे दिसून येते. (Weather Update Maharashtra)

 डॉ. रामचंद्र साबळे 

राज्यातील एकूण २४ जिल्ह्यांत जून महिन्यात पावसाची कमतरता (Rain Deficiency) दिसून आली. चोवीस पैकी ३ जिल्ह्यांत अत्यंत कमी, तर २१ जिल्ह्यांत त्या त्या जिल्ह्याच्या सरासरीपेक्षा कमी पाऊस (Rainfall) झाल्याचे दिसून येते.

जून महिन्यात सातारा, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांत अत्यंत कमी पाऊस झाला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यांत त्या त्या जिल्ह्यांच्या सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. मराठवाड्यातील जालना, वाशीम व हिंगोली आणि विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांत त्या त्या जिल्ह्याच्या सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

सद्यःस्थितीत महाराष्ट्रातील धरणसाठ्यातही कमी पाणी शिल्लक असून, संपूर्ण महाराष्ट्र चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. या आठवड्यात राज्यात हलक्‍या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍यता आहे.

कोकण ः

आज आणि उद्या ठाणे व पालघर जिल्ह्यांत प्रतिदिन ४० मि.मी. तर रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ४४ ते ५६ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग १३ ते १६ कि.मी. राहील. सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान २९ ते ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस, रायगड जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस, तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग १३ ते १६ कि.मी. राहील.

उत्तर महाराष्ट्र ः

आज आणि उद्या धुळे व जळगाव जिल्ह्यांत ७ ते १६ मि.मी. तर नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत २२ ते २९ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग १५ ते १७ कि.मी. राहील. सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७३ ते ८२ टक्के, तर दुपारची ४५ ते ६५ टक्के राहील.

मराठवाडा ः

उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी जिल्ह्यांत आज ६ ते ११ मि.मी. पाऊस, तर उद्या पावसात उघडीप राहणे शक्‍य आहे. जालना व नांदेड जिल्ह्यांत आज १६ ते १९ मि.मी. पाऊस, तर उद्या उघडीप राहणे शक्‍य आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आज ४० मि.मी. तर उद्या २० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. हिंगोली जिल्ह्यात आज आणि उद्या पावसात उघडीप राहणे शक्‍य आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १५ ते १९ कि.मी. राहील. औरंगाबाद जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ८ कि.मी. राहील. कमाल तापमान औरंगाबाद जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, तर लातूर व जालना जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस राहील. नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः किंवा अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६६ ते ८० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४२ ते ६३ टक्के राहील.

पश्‍चिम विदर्भ ः

अमरावती जिल्ह्यात आज ३० मि.मी., तर उद्या १५ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. आज बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत १६ ते १९ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाशीम जिल्ह्यात पावसात उघडीप राहणे शक्‍य आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १४ ते १८ कि.मी. राहील. सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

मध्य विदर्भ ः

नागपूर जिल्ह्यात आज १७ मि.मी. आणि उद्या ३ मि.मी., तर यवतमाळ जिल्ह्यात आज २२ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा वर्धा व नागपूर जिल्ह्यांत वायव्येकडून, तर यवतमाळ जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून राहील. सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६१ ते ६४ टक्के, तर दुपारची ४० ते ४२ टक्के राहील.

पूर्व विदर्भ ः

गोंदिया व भंडारा जिल्ह्यांत आज २६ मि.मी. आणि उद्या ४ ते ६ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. गडचिरोली जिल्ह्यात आज ३६ मि.मी. आणि उद्या १७ मि.मी. तर चंद्रपूर जिल्ह्यात आज १६ मि.मी. आणि उद्या ५ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते १२ कि.मी. राहील. सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६६ ते ७८ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४४ ते ५३ टक्के राहील.

दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र ः

कोल्हापूर जिल्ह्यात पश्‍चिम घाट भागात ४५ ते ५० मि.मी. रविवारी व सोमवारी पावसाची शक्‍यता असून, पुणे जिल्ह्यात रविवारी व सोमवारी २० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. सांगली जिल्ह्यात १५ ते १८ मि.मी., सातारा जिल्ह्यात ९ ते १० मि.मी., नगर जिल्ह्यात ४ ते ६ मि.मी. रविवारी व सोमवारी पावसाची शक्‍यता आहे, तर सोलापूर जिल्ह्यात सोमवारी ४ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १४ ते २० कि.मी. राहील. कमाल तापमान कोल्हापूर जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस, सातारा जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस, पुणे, नगर व सांगली जिल्ह्यांत ३२ ते ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस सर्वच जिल्ह्यांत राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७२ ते ९० टक्के व दुपारची ६० ते ७० टक्के राहील.

कृषी सल्ला ः

- जमिनीत ६५ मिमी ओलावा किंवा २ फूट खोलीपर्यंत माती ओली झाल्यानंतरच पेरणीस सुरुवात करावी.

- सोयाबीन पेरणीसाठी रुंद वरंबा सरी पद्धतीचा अवलंब करावा.

- गोठ्यातील जनावरांना आणि कुक्कुट पक्ष्यांना रोगप्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे.

- पेरणीसाठी बाजरी + तूर २ः१ ही आंतरपीक पद्धती अवलंबावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT