Sugarcane Crushing Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Crushing : मराठवाड्यात अतिरिक्त ऊसप्रश्‍न उद्‍भविण्याची शक्यता

मराठवाड्यात यंदा ऊसगाळपात सहभाग घेणाऱ्या कारखान्यांची संख्या वाढली आहे. संख्या वाढली असल्याने गाळपही गतीने होते आहे.

Team Agrowon

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत यंदा ऊस गाळपात (Sugarcane Crushing) तब्बल ६० कारखान्यांनी सहभाग नोंदविला आहे. त्यामध्ये ३५ खासगी व २५ सहकारी साखर कारखान्यांचा (Sugar Mills) समावेश असल्याची माहिती साखर विभागाच्या वतीने देण्यात आली. गाळपात सहभाग घेणाऱ्या कारखान्यांची संख्या वाढली असली, तरी काही ठिकाणी अतिरिक्त उसाचा (Excess Sugarcane) प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मराठवाड्यात यंदा ऊसगाळपात सहभाग घेणाऱ्या कारखान्यांची संख्या वाढली आहे. संख्या वाढली असल्याने गाळपही गतीने होते आहे. परंतु जालना जिल्ह्यातील काही भागात कारखान्यांच्या गाळपाची क्षमता व प्रत्यक्ष उपलब्ध ऊस लक्षात घेता अतिरिक्त उसाचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यंदाच्या ऊसगाळपात मराठवाड्यातील ६० कारखान्यांनी सहभाग नोंदविला.

त्यामध्ये उस्मानाबादमधील सर्वाधिक १२, त्यापाठोपाठ लातूरमधील ११, औरंगाबाद व परभणीतील प्रत्येकी ७, बीडमधील आठ, जालन्यातील चार, हिंगोलीतील पाच व नांदेडमधील सहा कारखान्यांचा समावेश आहे.

या सर्व कारखान्यांनी ८ जानेवारीपर्यंत १ कोटी १३ लाख ५४ हजार ४६७ टन उसाचे गाळप करत १ कोटी ३ लाख २३ हजार ७१५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. उसाचे गाळप करताना जालना जिल्ह्यातील कारखान्यांचा सरासरी साखर उतारा सर्वात कमी, तर हिंगोली जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा सरासरी साखर उतारा सर्वात जास्त राहिला आहे.

जिल्हानिहाय ऊसगाळप, साखर उताऱ्याची स्थिती

उस्मानाबाद : जिल्ह्यातील गाळपत सहभाग घेणाऱ्या बारा कारखान्यांमध्ये ८ खासगी व ४ सहकारी कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांनी २८ लाख ३३ हजार ५५ टन उसाचे गाळप करीत सरासरी ८.७६ टक्के साखर उताऱ्याने २४ लाख ८० हजार ४३० क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

औरंगाबाद : जिल्ह्यातील ऊसगाळपात सहभाग घेणाऱ्या सात कारखान्यांमध्ये चार खासगी तर तीन सहकारी कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांनी ९ लाख ६९ हजार ११८ टन उसाचे गाळप करत सरासरी ९.८७ टक्के साखर उताऱ्याने ९ लाख ५६ हजार १७५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

जालना : जिल्ह्यातील गाळपात सहभाग घेणाऱ्या चार कारखान्यांत एक खासगी व तीन सहकारी कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांनी १० लाख २० हजार ४२० टन उसाचे गाळप करीत सरासरी ९.५५ टक्के साखर उताऱ्याने ९ लाख ७४ हजार ८५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

बीड : जिल्ह्यातील ऊसगाळपात सहभाग घेणाऱ्या आठ कारखान्यांमध्ये २ खासगी व ६ सहकारी कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांनी १६ लाख ९३ हजार २२१ टन उसाचे गाळप करत सरासरी ७.३६ टक्के साखर उताऱ्याने १२ लाख ४५ हजार ९६० क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

परभणी : जिल्ह्यातील गाळपात सहभाग घेणाऱ्या सर्व सातही कारखान्यांनी १२ लाख ९३ हजार २८५ टन उसाचे गाळप करत सरासरी ९.३४ टक्के साखर उताऱ्याने १२ लाख ८ हजार ३२० क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

हिंगोली : जिल्ह्यातील दोन खासगी व तीन सहकारी मिळून पाच कारखान्यांनी गाळपात सहभाग नोंदविला. या कारखान्यांनी ८ लाख ११ हजार ६७२ टन उसाची गाळप करीत सरासरी १०.२८ टक्के साखर उताऱ्याने ८ लाख ३४ हजार ३० क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

नांदेड : जिल्ह्यातील पाच खासगी व एक सहकारी मिळून सहा कारखान्यांनी ९ लाख ४६ हजार २८८ टन उसाचे गाळप केले. सरासरी ९.६३ टक्के साखर उताऱ्याने या कारखान्यांनी ९ लाख १० हजार ९९० क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

लातूर : जिल्ह्यातील ६ खासगी व ५ सहकारी मिळून ११ कारखान्यांनी गाढवाच सहभाग घेतला. या कारखान्यांनी १७ लाख ८७ हजार ४४८ टन उसाचे गाळप करत १७ लाख १२ हजार ९६० क्विंटल साखर उत्पादन केले.या सर्व कारखान्यांनी सरासरी ९.५८ टक्के साखर उतारा राखला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सिताफळाची आवक वाढली; आवळ्याला कमी उठाव, हिरवी मिरची नरमली, लिंबुचे दर टिकून, लसणाचे दर स्थिर

Leopard Attack : निमगावात बिबट्याचा घोड्याच्या शिंगरूवर हल्ला

Dam Water Discharge : वाघूर, गिरणातून विसर्ग

Crop Damage : सोलापूर जिल्ह्यात १.३३ लाख हेक्टरवरील पिकांना तडाखा

Rain Damage Jalgaon : पावसाने जळगाव जिल्ह्यात हानी

SCROLL FOR NEXT