नांदेड : प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड कार्यालयाअंतर्गत नांदेड विभागातील साखर कारखान्यांकडून (Sugarcane Factory) गाळपाला सध्या गती मिळाली आहे. सध्या सुरू असलेल्या २९ कारखान्यांपैकी ९ सहकारी तर २० खासगी कारखान्यांचा समावेश आहे.
आजपर्यंत या कारखान्यांनी ४० लाख ९६ हजार ९७८ टन उसाचे गाळप (Sugarcane Crushing ) तर ३८ लाख ९३ हजार ३१५ क्विंटल साखरेचे उत्पादन केल्याची माहिती साखर सहसंचालक सचिन रावल यांनी दिली.
प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड विभागातील नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यांतून गाळप हंगाम २०२२-२३ साठी ३० कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते. यात १९ खासगी तर ११ सहकारी साखर करण्यांचा समावेश होता.
यंदा हंगामाची सुरुवात २२ ऑक्टोबर रोजी लातूर जिल्ह्यातील सिद्धी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज या खासगी साखर कारखान्याच्या गाळपाने झाली.
आजपर्यंत विभागातील २९ कारखाने सुरू झाले आहेत. यात परभणी जिल्ह्यात सात खासगी, हिंगोली जिल्ह्यात दोन खासगी व तीन सहकारी, नांदेड जिल्ह्यात पाच खासगी व एक सहकारी तसेच लातूर जिल्ह्यातील पाच सहकारी व सहा खासगी अशा कारखान्यांचा समावेश आहे.
आजपर्यंत या कारखान्यांनी ४० लाख ९६ हजार ९७८ टन उसाचे गाळप तर ३८ लाख ९३ हजार ३१५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. विभागाचा सरासरी साखर उतारा ८.८१ टक्के असल्याची माहिती साखर सहसंचालक सचिन रावल यांनी दिली.
गंगाखेड शुगरची गाळपात आघाडी
नांदेड विभागातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शुगर अँड एनर्जी लि. हा खासगी साखर कारखाना यंदा ११ नोव्हेंबर रोजी सुरू झाला.
या कारखान्याने गाळपात विभागामध्ये आघाडी घेतली आहे. या कारखान्याने आजपर्यंत तीन लाख १९ हजार ३० टन उसाचे गाळप तर दोन लाख ९७ हजार ४०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.
कारखानानिहाय ऊस गाळप व साखर उत्पादन
(गाळप टनांत, साखर उत्पादन क्विंटलमध्ये)
जिल्हा कारखाने ऊस गाळप साखर उत्पादन
नांदेड ६ ०८,१७,८४९ ०७,७३,१९५
लातूर ११ १५,०८,३७६ १४,३१,४६०
परभणी ७ १०,७६,०९६ ०९,८५,२८६
हिंगोली ५ ०६,९४,६६३ ०७,०३,३८०
एकूण २९ ४०,९६,९७८ ३८,९३,३१५
विभागाचा सरासरी साखर उतारा : ९.५० टक्के
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.