Eknath Shinde Agrowon
ताज्या बातम्या

Diwali Grocery : दिवाळीचा शिधा मिळणार १०० रुपयांत

यंदाच्या दिवाळीत शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत दिवाळी फराळासाठी लागणारा शिधा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

टीम ॲग्रोवन

मुंबई : यंदाच्या दिवाळीत शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत दिवाळी फराळासाठी (Diwali Faral) लागणारा शिधा (Grocery) देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. यासाठी ५१३ कोटी २४ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना दिवाळीसाठी लागणारा शिधा नाममात्र दरात देण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने सादर केलेल्या या प्रस्तावावर चर्चा झाल्यानंतर खर्चास मान्यता देण्यात आली.

शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणाऱ्या या संचामध्ये प्रती १ किलोच्या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व १ लिटर पामतेलाचा समावेश असेल. राज्यातील १ कोटी ७० लाख शिधापत्रिकाधारकांना या निर्णयाचा लाभ होईल.

हा संच एक महिन्याच्या कालावधीकरिता देण्यात येऊन त्याचे वितरण ई-पॉस प्रणालीद्धारे करण्यात येईल. यासाठी ५१३ कोटी २४ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. हा शिधावस्तूंचा संच दिवाळीपूर्वी वाटप व्हावा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lumpy Skin Disease: राज्यात नऊ हजार पशुधनांना ‘लम्पी’

Rain Deficit: पावसाअभावी भाजीपाला शेतीला फटका

Silk Farming: रेशीम शेतीसाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे: कोल्हे

Agricultural University Vacancy: कृषी विद्यापीठांत ५७ टक्के जागा रिक्त

PM Suryaghar Yojana: ‘सूर्यघर’चा साडेपंधरा हजार ग्राहकांनी घेतला लाभ

SCROLL FOR NEXT