Chana Pod Borer  Agrowon
ताज्या बातम्या

Chana Disease : हरभरा पिकावर घाटे अळी, ‘मर’चा प्रादुर्भाव

लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यातील हरभरा पिकावर काही ठिकाणी घाटे अळी, तर काही ठिकाणी ‘मर’चा प्रादुर्भाव आढळून आला आहे.

Team Agrowon

Chana Disease उस्मानाबाद : लातूर कृषी विभागातील (Agriculture Department) पाच जिल्ह्यातील हरभरा पिकावर काही ठिकाणी घाटे अळी (Chana Pest), तर काही ठिकाणी ‘मर’चा प्रादुर्भाव (Chana Disease) आढळून आला आहे.

लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यांत हरभरा-पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख ८६ हजार १२४ हेक्टर आहे.

त्या तुलनेत यंदा ११ लाख ५९ हजार ८३९ हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झालेली आहे. रब्बीचे पाचही जिल्ह्यांतील एकूण पेरणी झालेले क्षेत्र १६ लाख ७९ हजार हेक्टर असून, त्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त क्षेत्र हरभरा पिकाने व्यापले आहे.

पीक सध्या पक्वतेच्या अवस्थेत आहे. विभागातील सर्व पाचही जिल्ह्यांत हरभरा पिकावर काही प्रमाणात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यावर उपाययोजना कृषी विभागाकडून सुचविल्या जात आहेत.

तसेच विभागातील सर्व जिल्ह्यात काही ठिकाणी पिकावर अल्प प्रमाणात मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT