Vegetable Cultivation Agrowon
ताज्या बातम्या

Vegetable Cultivation : रसायनीत मळे लावणीची लगबग सुरू

रसायनी पाताळगंगा परिसरातील सिंचनाचा आधार असलेले शेतकरी दुबारा पिकांसाठी शेतात मशागतीचे काम सुरू केले आहे.

टीम ॲग्रोवन

रसायनी : रसायनी पाताळगंगा परिसरातील सिंचनाचा (Irrigation) आधार असलेले शेतकरी दुबारा पिकांसाठी शेतात मशागतीचे काम सुरू केले आहे. जांभिवली गावाच्या हद्दीतील माणिकगडाच्या पायथ्याशी असलेल्या बामणोली धरणाचा (Bamnoli Dam) जांभिवली पंचक्रोशीतील तसेच पाताळगंगा नदीकाठच्या गावांतील आणि मोहोपाडा येथील शेतकरी एमआयडीसीच्या जलशुद्धीकरण केंद्रातून सोडण्यात येणार्‍या सांडपाण्यावर भाजीपाला (Vegetable Cultivation) आणि भाताचे पीक घेत आहे.

परिसरातील चावणे, आपटे, वडगाव, वासांबे मोहोपाडा पंचक्रोशीतील शेतकरी खरिपाच्या हंगामात भाताचे पीक घेत असतात. यावर्षी सुरुवातीला लवकर लावणी आणि जास्त उंचीच्या भातपिकाला परतीच्या पावसाचा काहीसा फटका बसला आहे.

मात्र, आता बहुतेकांचे भातपीक चांगले आल्याने शेतकरी समाधानी आहे. त्यामुळे सिंचनाचा आधार असलेल्या शेतकर्‍यांनी दुबार भाजीपाल्याचे मळे लावण्यासाठी मशागतीचे काम सुरू केले आहे.

भेंडी, काकडी, शिरोळी, घोसाळी जास्त प्रमाणात पीक घेतले जाते. तसेच कारली, पडवळ, मिरची, गवार, कोथिंबीर, वांगी आदी पीक घेत आहे, असे सांगण्यात आले. दरम्यान, बैलाच्या साह्याने शेतात चांगली मशागत करता येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Clean Milk Production: स्वच्छ दूध उत्पादनासाठी महत्वाचे ४ उपाय; दुधाची गुणवत्ताही सुधारण्यास होईल मदत

Farmer Protest: शेतकरी प्रश्नांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा (श.प) नाशिकमध्ये आक्रोश मोर्चा 

Banana Farming: केळी बागेत काटेकोर सिंचनासह कीड, रोग नियंत्रणावर भर

Cucumber Farming : तंत्रज्ञानाचा वापरातून काकडीचे पीक फायदेशीर

Air Pollution: जनावरांमुळे होणारे वायुप्रदूषण कमी करण्याचे उपाय

SCROLL FOR NEXT