Nashik News: ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय सेवा सुलभ, पारदर्शक व वेळेत मिळाव्यात या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या ‘आपले सरकार’ या अधिकृत ऑनलाइन पोर्टलवर जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामविकास विभागाच्या एकूण सात महत्त्वाच्या सेवा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या डिजिटल सेवांचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी केले..श्री. पवार यांनी सांगितले, की शासनाच्या डिजिटल महाराष्ट्र संकल्पनेनुसार नागरिक-केंद्रित सेवा अधिक सुलभ करण्यासाठी जिल्हा परिषद सातत्याने प्रयत्नशील आहे. ‘आपले सरकार’ पोर्टलवरील या सेवांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायत कार्यालयात वारंवार फेऱ्या मारण्याची आवश्यकता राहणार नाही..Rural Development: सुसंवादाने सोडविला वादातील प्रलंबित रस्त्याचा प्रश्न.नागरिक घरबसल्या ऑनलाइन अर्ज सादर करू शकतील, अर्जाची स्थिती तपासू शकतील तसेच आवश्यक दाखले वेळेत प्राप्त करू शकतील. या उपक्रमामुळे नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचणार असून सेवा वितरण प्रक्रियेत पारदर्शकता, गतिमानता व विश्वासार्हता वाढणार आहे. विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना याचा मोठा लाभ होणार असून, प्रशासकीय कामकाजात डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर वाढेल, असेही श्री. पवार यांनी नमूद केले..संपूर्ण प्रक्रिया डिजिटलया सर्व सेवा ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध असल्याने नागरिकांना अर्जासाठी प्रत्यक्ष कार्यालयात उपस्थित राहण्याची गरज उरणार नाही. अर्ज सादरीकरणापासून ते दाखला मिळेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पार पडणार आहे..Aaple Sarkar Kendra : अमरावती जिल्ह्यात रखडली आपले सरकार सेवा केंद्र योजना.उपलब्ध करून देण्यात आलेल्या सेवाजन्म नोंद दाखलामृत्यू नोंद दाखलाविवाह नोंद दाखलादारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखलाग्रामपंचायत येणे बाकी नसल्याचा दाखलानमुना ८ चा उतारानिराधार असल्याचा दाखला.आपले सरकार पोर्टलवरील या सुविधा नागरिकांच्या सोईसाठीच आहेत. त्यामुळे नागरिकांनी या डिजिटल सेवांचा वापर करावा.ओमकार पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.