Cotton Bollworm Agrowon
ताज्या बातम्या

Cotton Bollworm : मराठवाड्यात कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव

मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, जालना, औंरगाबाद या जिल्ह्यांमधील कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव ४ ते ५ टक्के आढळून आला आहे.

टीम ॲग्रोवन

परभणी ः मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, जालना, औंरगाबाद या जिल्ह्यांमधील कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा (Cotton Bollworm) प्रादुर्भाव ४ ते ५ टक्के आढळून आला आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील (VNMKV) कृषी कीटकशास्त्र विभागाच्या क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत (Cropsap Project) केलेल्या सर्वेक्षणाव्दारे हे स्पष्ट झाले आहे. ‘‘आगामी काळात प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी फरदड कपाशीचे उत्पादन (Cotton Production) घेण्याचा मोह टाळावा. रब्बी पिकांचे उत्पादन घ्यावे,’’ असे कृषी कीटकशास्त्रज्ञ प्रा. पी. एस. नेहरकर यांनी सांगितले.

मागील दोन आठवड्यांपासून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी कीटकशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञांनी क्रॉपसॅप प्रकल्पा अंतर्गत परभणी जिल्ह्यातील परभणी, सेलू, मानवत, पाथरी, नांदेड जिल्ह्यांतील नांदेड, लोहा, कंधार, हिंगोली जिल्ह्यातील वसमत, औंढा नागनाथ, बीडमधील अंबाजोगाई, परळी, केज, जालना जिल्ह्यातील परतूर, मंठा, अंबड, घनसावंगी, जाफराबाद, बदनापूर तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद, पैठण तालुक्यात प्रक्षेत्र भेटी दिल्या. त्या वेळी गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव ४ ते ५ टक्के झाला असल्याचे आढळून आले.

आगामी काळात प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील अनेक भागांत विविध माध्यमातून सिंचनासाठी पाणी उपलब्ध आहे. त्याबरोबरच कापसाला चांगला उठाव असल्याने शेतकरी पाणी, खतांच्या मात्रा देऊन कपाशीची फरदड घेण्यावर भर देत आहेत. परंतु त्यामुळे गुलाबी बोंड अळीच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होते.

तिचे शाश्वत व्यवस्थापन करण्यासाठी वेळेवर हंगाम संपविणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत फरदडीचे उत्पादन घेऊ नये, असे आवाहन प्रा. नेहरकर यांनी केले. या वेळी डॉ. अनंत लाड, डॉ. राजरतन खंदारे, डॉ. योगेश मात्रे उपस्थित होते.

प्रादुर्भाव टाळण्यासाठी हे करावे...

- कपाशीची फरदड घेऊ नये

- वेळेवर कपाशीची वेचणी करून डिसेंबरनंतर शेतात कपाशीचे पीक ठेवू नये

- हंगाम संपल्यानंतर शेतामध्ये जनावरे चरण्यासाठी सोडावीत

- हंगाम संपल्यावर ताबडतोब पऱ्हाटीची विल्हेवाट लावावी.

- शेतात, शेताजवळ पऱ्हाटी रचून ठेवू नये.

- पऱ्हाटीचा बारीक चुरा करून कंपोष्ट खतासाठी त्याचा उपयोग करावा

- जिनिंग मिल आणि साठविलेल्या ठिकाणी कामगंध सापळ्यांचा वापर करावा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT