Cotton bollWorm Agrowon
ताज्या बातम्या

Cotton Bollworm : कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव

Cotton Pest : मराठवाडा विभागातील वेळेवर लागवड झालेले कपाशीचे पीक पाते, फुले व बोंडे लागण्याच्या अवस्थेत असून, त्यावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Cotton Crop : परभणी ः मराठवाडा विभागातील वेळेवर लागवड झालेले कपाशीचे पीक पाते, फुले व बोंडे लागण्याच्या अवस्थेत असून, त्यावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. नियमित सर्वेक्षण करून कपाशीवरील डोमकळ्या आतील अळीसह तोडून, जमा करून, जाळून अथवा जमिनीत पुरून नष्ट कराव्यात. गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी कपाशीच्या पिकामध्ये कामगंध सापळे लावावेत, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रातील शास्त्रज्ञांनी केले आहे.

मराठवड्यामध्ये या वर्षी कपाशी पिकाची लागवड एकाच वेळी न होता टप्प्याटप्प्याने झालेली आहे. त्यामुळे किडीला सतत खाद्य उपलब्ध होत आहे. परिणामी, गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. सद्यःस्थिती वातावरण ढगाळ असल्यामुळे कपाशीच्या पिकांवर गुलाबी बोंड अळीचे पतंग सक्रिय झालेले आढळून येत आहेत. मादी पतंग पाते, फुले, बोंडे यावर अंडी घालतात. या किडीचा प्रादुर्भावाची निरीक्षणासाठी प्रतिहेक्‍टरी ५ कामगंध सापळे पिकाच्या उंचीच्या एक ते दीड फूट उंचीवर लावावेत.

कामगंध सापळ्यामध्ये सलग तीन दिवस ८ ते १० पतंग प्रति सापळा किंवा १ अळी प्रति १० फुले किंवा १० बोंडे किंवा १० टक्के प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या किंवा बोंडे दिसून आल्यास शिफारशीत रासायनिक कीटकनाशकाची फवारणी कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार करावी, असे आवाहन कीटकशास्त्रज्ञ डॉ. डी. डी. पटाईत, विस्तार कृषिविद्यावेत्ता डॉ. जी. डी. गडदे एम. बी. मांडगे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या कृषी वाहिनी दूरध्‍वनी क्रमांक ०२४५२ २२९०००.

एक एकर कपाशीची २० जून रोजी लागवड केलेली आहे. कपाशी पाते, फुले, बोंडे अवस्थेत आहे. बोंडामध्ये गुलाबी बोंड अळी आढळून येत आहे. आमच्या गावातील इतरही शेतकऱ्यांच्या कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.
बाबासाहेब रनेर, शेतकरी, बाभळगाव, ता. पाथरी, जि. परभणी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women in Agriculture : पुसा येथे जागतिक शेतकरी महिला परिषदेचे आयोजन; राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटनाची शक्यता

India Exports To China: भारताची चीनमध्ये निर्यात ३३ टक्क्यांनी वाढली, शेतमाल, सागरी उत्पादनांचा समावेश

Agriculture Exhibition 2026: यांत्रिकीकरणासह नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाने वेधले लक्ष

Solar Power Project: जालन्यात ३४१ मेगावॉट क्षमतेचे ७१ प्रकल्प मंजूर

Agrowon Exhibition 2026: कृषी उद्योग विकास महामंडळाचा महाअॅग्रो मार्ट, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म

SCROLL FOR NEXT