Livestock Market
Livestock Market  Agrowon
ताज्या बातम्या

Livestock Market : नगर जिल्ह्यात जनावरांचे बाजार सुरू करण्यास परवानगी

Team Agrowon

सूर्यकांत नेटके ः अॅग्रोवन वृत्तेसवा

नगर ः ‘लम्पी स्कीन’ची बाधा वाढत असल्याने गुरांचे बाजार भरण्यावर चार महिन्यांपूर्वी बंदी घालण्यात आली होती. मात्र आता लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव कमी झाल्याने व जवळपास सर्वच जनावरांचे लसीकरण झाल्याने अनेक अटीच्या अधीन राहून राज्यात पहिल्यांदाच नगर जिल्ह्यात गुरांचे बाजार सुरू करण्याला, जनावरांची जिल्हांतर्गत वाहतूक करण्याला परवानगी देण्यात आली आहे. नगरला बाजार सुरू झाल्यानंतर ज्या जिल्ह्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव कमी झाला आहे त्या जिल्ह्यात बाजार सुरू होणार असल्याचे दिसत आहे.

राज्यात साधारण सहा महिन्यांपूर्वी लम्पी स्कीनच्या आजाराची जनावरांना बाधा होऊ लागली. गेल्या वर्षीही हा प्रादुर्भाव सुरू होता, परंतु यंदा त्याची तीव्रता अधिक असल्याचे दिसून येत होते. ज्या गावांत बाधित जनावरे आढळून येत होती, त्या गावांसह पाच किलोमीटर परिसरात प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले जाते होते. जनावरांचे लसीकरणही

सुरू केले, परंतु जनावरांची वाहतूक व बाजारामुळे प्रादुर्भाव कमी होत नसल्याने साधारण तीन-चार महिन्यांपूर्वी राज्यातील जनावरांचे बाजार बंद केले होते. खरेदी-विक्री होत नसल्याने दुभत्या गाईंचे दरही बऱ्यापैकी पडले होते.

..या आहेत अटी

जिल्हाअंतर्गत वाहतूक करावयाच्या जनावरांना २८ दिवसांपूर्वी लसीकरण असणे बंधनकारक.

वाहतूक करावयाच्या गुरांची ओळख पटण्यासाठी कानात टॅग नंबर व इनाम पोर्टलवर नोंदणी बंधनकारक

संक्रमित असलेल्या व संक्रमित नसलेल्या भागातून गुरांची वाहतूक करण्यासाठी आरोग्य प्रमाणपत्र द्यायला पशुधन विकास अधिकारी याचे स्वास्थ प्रमाणपत्र आवश्यक.

टॅगिंग व रोग प्रतिबंधक लसीकरण झाल्याची खात्री झाल्याशिवाय खरेदी-विक्री होणार नाही याची बाजार समिती, ग्रामपंचायतीने खात्री करावी.

लम्पी स्कीनची बाधा वाढत असल्याने प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनावरांचे बाजार व वाहतूक बंद केली होती. आता प्रादुर्भाव कमी झालाय, लसीकरणही बऱ्यापैकी झाले आहे. त्यामुळे काही अटी घालून वाहतुकीला व बाजार भरण्याला परवानगी दिली आहे.

- डॉ. सुनील तुंबारे, पशुसंवर्धन उपायुक्त, नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT