Gram Panchayat Election Agrowon
ताज्या बातम्या

Gram Panchayat Election : राज्यात ग्रामपंचायतीसाठी शांततेत मतदान

राज्यभरात गावकारभारी निवडण्यासाठी सात हजार ७५१ ग्रामपंचायतींसाठी रविवारी (ता. १८) मतदान झाले. राज्यात शांततेत मतदान पार पडल्याचे वृत्त आहे.

डॉ. गणेश देशमुख, संदीप डिघुळे, डॉ. संजय गावडे डॉ. सुदाम पाटील

पुणे ः राज्यभरात गावकारभारी निवडण्यासाठी सात हजार ७५१ ग्रामपंचायतींसाठी रविवारी (ता. १८) मतदान (Gram Panchayat Election) झाले. राज्यात शांततेत मतदान पार पडल्याचे वृत्त आहे. आज झालेल्या मतदानाची मंगळवारी (ता. २०) मतमोजणी होणार असून लगेच निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

राज्यातील ३४ जिल्ह्यांत ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या सात हजार ७५१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये थेट सरपंच निवड असल्यामुळे मोठी चुरस पाहायला मिळाली.

तसेच तरुणांचा राजकारणात येण्याचा कल अधिक आहे. सुशिक्षित तरुणांनी ही निवडणुकीच्या प्रक्रियेत हिरिरीने सहभाग नोंदविला आहे. बहुतांश गावांत तरुणांनी जुन्या जाणत्यांसमोर आव्हाने उभी केली. अनेक ठिकाणी राजकीय पक्षांचे प्राबल्य पाहायला मिळत आहे. निवडणुकीत थेट पक्षाचे निवडणूक चिन्ह नसले तरी नेत्यांनी आपले पॅनेल उभे करून प्रत्यक्षपणे प्रचारात सहभाग घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सरकीचा भाव तेजीत; कापूस टिकून, सोयाबीनमध्ये चढ उतार, खरबूजाला उठाव तर टोमॅटो आवक टिकून

Orchards Rain Damages: पावसाचा फळबागांचा फटका

khandesh Water Storage: मध्यम, लघु प्रकल्पांत जलसाठा ५० टक्क्यांपर्यंत

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

SCROLL FOR NEXT