Sugarcane  Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Bill : कर्नाटकातील ऊस उत्पादकांना ४०० रुपयांचा दुसरा हप्ता द्या

Sugarcane Season : कर्नाटकातील वजनकाटे ऑनलाइन करणे व महाराष्ट्र सरकारप्रमाणे कर्नाटक सरकारनेही फसवणूक केलेल्या ऊसतोडणी मुकादमांवर कारवाई करण्यासह विविध विषयांवर विजापूर येथे बैठक झाली.

Team Agrowon

Kolhapur News : ‘‘राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर साखरेला चांगला दर असल्याने कर्नाटकातील ऊस उत्पादकांना प्रतिटन ४०० रुपये दुसरा हप्ता द्यावा, अशी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी कर्नाटकचे साखरमंत्री शिवानंद पाटील यांच्याकडे केली.

कर्नाटकातील वजनकाटे ऑनलाइन करणे व महाराष्ट्र सरकारप्रमाणे कर्नाटक सरकारनेही फसवणूक केलेल्या ऊसतोडणी मुकादमांवर कारवाई करण्यासह विविध विषयांवर विजापूर येथे बैठक झाली.

या वेळी मंत्री पाटील यांनी कर्नाटकातील ऊस उत्पादक व वाहतूकदारांच्या प्रश्‍नाबाबत तातडीने मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावून तोडगा काढण्याबाबत प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

शेट्टी म्हणाले, ‘‘कर्नाटक राज्यातील साखर कारखान्यांमध्ये काटामारीचे प्रमाण जास्त आहे. राज्यातील साखर कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाइन करणे गरजेचे आहे.

’’ या वेळी सावकर मादनाईक, राजेंद्र गड्यान्नावर, संदीप राजोबा, तात्या बसण्णावर, गणेश इळेगे, बाबूराव पाटील यांच्यासह चिकोडी , रायबाग, बेळगाव, विजापूर, बागलकोट या जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व वाहतूकदार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

Maharashtra Winter Weather : किमान तापमानात चढ-उतार शक्य

SCROLL FOR NEXT