Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : एक रुपयात भरा पीकविमा

Kharif Crop : शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पीकविमा काढण्यासाठी सर्वसमावेशक पंतप्रधान पीकविमा योजना जिल्ह्यात लागू झाली आहे. यात सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद व ज्वारी या सहा पिकांसाठी ३१ जुलैपर्यंत शेतकऱ्‍यांना भाग घेता येईल.

Team Agrowon

Kharif Season : नांदेड : शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पीकविमा (Crop Insurance) काढण्यासाठी सर्वसमावेशक पंतप्रधान पीकविमा योजना जिल्ह्यात लागू झाली आहे. यात सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद व ज्वारी या सहा पिकांसाठी ३१ जुलैपर्यंत शेतकऱ्‍यांना भाग घेता येईल.

नांदेड जिल्ह्यासाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स ही विमा कंपनी नेमण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी अंतिम तारखेची वाट न पाहता विमा भरून घेण्याचे आव्हान जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.    

   
खरीप २०२३ साठी लागू झालेली ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरूपाची आहे. खातेदाराव्यतिरिक्त कुळाने अगर भादेपट्टीने शेती करणारे शेतकरीही या योजनेत सहभागी होऊ शकतात. या योजनेत नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळते.

खरीप हंगामात जिल्ह्यातील ज्वारी, मूग, उडीद, तूर, सोयाबीन व कापूस पिकासाठी शेतकऱ्यांना विमा भरता येईल. आपले सरकार सेवा केंद्र (सीएससी), बँक, प्राथमिक कृषिपत पुरवठा सहकारी संस्था, तसेच ऑनलाइन पद्धतीने विमा भरता येईल. यात सहभागासाठी शेतकऱ्यांना सातबारा, आधार कार्ड, बँक पासबुक प्रत, पिकाची पेरणीबाबतचे स्वयंघोषना पत्र लागेल.

सहा पिकांचा समावेश; समावेशाची ३१ जुलै मुदत
पीकनिहाय विमा
संरक्षित रक्कम (हेक्टरी)
पीक विमा संरक्षित रक्कम
कपाशी ५७,५००
सोयाबीन ५४,५००
तूर ३६,८०२
ज्वारी ३०,०००
उडीद २२,५००
मूग २२,५००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT