River pollution Agrowon
ताज्या बातम्या

River pollution : पाताळगंगा नदीला प्रदूषणाचा विळखा

नदीपात्रात मासे मृत होण्याच्या घटना समोर आल्‍या असून प्रदूषणामुळे पाण्याचा रंगही बदलल्‍याचे दिसते. पाताळगंगा नदीचे प्रदूषण वाढण्याची कारणे अनेक आहेत.

Team Agrowon

खोपोली, जि. नवी मुंबई ः पाताळगंगा नदी (Patalganga River) रायगड जिल्ह्यातील प्रमुख नद्यांपैकी एक असून शेकडो गावे व औद्योगिक क्षेत्रातून तिचा प्रवास सुरू आहे.

दीड लाखांच्या घरात लोकसंख्या असलेले खोपोली शहर पिण्यापासून ते दैनंदिन वापराच्या पाण्यासाठी याच नदीवर अवलंबून आहे. नदीतील प्रदूषण वाढत असल्‍याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

अनेकदा नदीपात्रात मासे मृत होण्याच्या घटना समोर आल्‍या असून प्रदूषणामुळे पाण्याचा रंगही बदलल्‍याचे दिसते. पाताळगंगा नदीचे प्रदूषण वाढण्याची कारणे अनेक आहेत.

औद्योगिक क्षेत्रातील अनेक कंपन्यांमधून छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणावर रसायन मिश्रित सांडपाणी नदीत सोडण्यात येते. खोपोली शहरातील हजारो लिटर सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न होता थेट नदीत सोडले जाते.

ॲसिड व घातक रसायन वाहून नेणारे टँकर नदीकिनारी उभी करून धुतले जातात. तसेच मासेमारीसाठी रसायन नदीच्या प्रवाहात टाकण्याचे प्रकारही घडत आहेत.

एकीकडे पाताळगंगा नदी प्रदूषित होत आहे, तर दुसरीकडे स्थानिक प्रशासन, रायगड जिल्हा प्रदूषण नियंत्रण विभागाचे अधिकारी एखादी घटना समोर आल्यावर केवळ नमुने तपासणी करून वेळकाढू धोरण अवलंबत असल्‍याचे नागरिकांचे म्‍हणणे आहे.

तपासलेल्या नमुन्याचे अहवाल काय, प्रदूषणास जबाबदार कोण, त्‍यांच्यावर काय कारवाई केली, याबाबत अधिकृत प्रक्रिया पूर्णत्वास जात नसल्याने पाताळगंगा नदीचे प्रदूषण वाढतच आहे.

पाताळगंगा नदीपात्रात मासे मृत होण्याच्या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी पाण्याचे नमुने तपासणी व अहवाल देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आयुब तांबोळी, तहसीलदार, खालापूर
खोपोली शहरातील सांडपाणी शुद्धीकरण योजनेला अंतिम मंजुरी प्राप्त झाली आहे. आवश्यक निधीही मंजूर करण्यात आला आहे. यात संपूर्ण शहरात भूमिगत गटार योजना, सांडपाणी एकत्रीकरण, सिव्हेज ट्रीटमेंट प्रकल्‍प उभारून त्याद्वारे प्रक्रिया करून पाण्याचे शुद्धीकरण व पुनर्वापर करण्यात येणार आहे.
अनुप दुरे-पाटील, मुख्याधिकारी, खोपोली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Health Protection: पशू, मानव आरोग्याचे संरक्षण

Marigold Farming: तीन हंगामांत झेंडूचे हुशारीने नियोजन

Agriculture Success Story: कुक्कुटपालन पूरक नव्हे, झाला मुख्य व्यवसाय

Sugarcane Farmer Issues: कष्ट शेतकऱ्यांचे, नफा इतरांचा

India Sugar Crisis: आकडे आणि नामुष्की

SCROLL FOR NEXT