Agriculture Department Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Crop Competition : खरीप पीक स्पर्धेत सहभागी व्हा

Kharif Season 2023 : सर्वसाधारण व आदिवासी गट दोहोंसाठी तालुका पातळीवर अनुक्रमे पाच, तीन व दोन हजार रुपये अशी पहिली तीन बक्षिसे आहेत.

Team Agrowon

Amaravati News : खरीप हंगामासाठी पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सहभागासाठी मूग व उडीद पीक उत्पादक शेतकऱ्यांनी ३१ जुलैपूर्वी तसेच भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल उत्पादकांनी ३१ ऑगस्टपूर्वी कृषी कार्यालयात सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी उत्पादन वाढविणे, प्रयोगशील शेतकऱ्यांचे मनोबल उंचावणे, त्यापासून इतरांना प्रेरणा मिळणे, अद्ययावत तंत्रज्ञान सर्वदूर पोहोचविणे असा स्पर्धेचा उद्देश असल्याचे सातपुते यांनी सांगितले.

स्पर्धेत बक्षिसे अशी आहेत...

सर्वसाधारण व आदिवासी गट दोहोंसाठी तालुका पातळीवर अनुक्रमे पाच, तीन व दोन हजार रुपये अशी पहिली तीन बक्षिसे आहेत. जिल्हास्तरावर पहिले बक्षीस १० हजार असून, दुसरे ७ हजार व तिसरे ५ हजार रुपये आहे. राज्यस्तरावर पहिली तीन बक्षिसे अनुक्रमे ५० हजार, ४० हजार व ३० हजार रुपये अशी आहेत.

‘एकापेक्षा जास्त पिकांसाठी सहभाग घेऊ शकता’

स्पर्धेतील सहभागासाठी संबंधित पिकाची शेतात किमान ४० आर. क्षेत्रावर लागवड असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना एकाचवेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी सहभाग घेता येईल. सर्व गटांसाठी पीकनिहाय ३०० रुपये प्रवेश शुल्क आहे.

इच्छुकांनी विहित अर्जासह प्रवेश शुल्काची पावती, सातबारा, आठ अ उतारा, तसेच आदिवासी बांधवांसाठी जात प्रमाणपत्र आदी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

स्पर्धेसाठी तालुका हा घटक आधारभूत आहे. त्यासाठी पुरेसे अर्ज प्राप्त झाल्यानंतर तालुका कृषी अधिकारी स्पर्धा जाहीर करतील. प्रत्येक तालुक्यात किमान स्पर्धक संख्या सर्वसाधारण गटासाठी १० व आदिवासी गटासाठी ५ असणे आवश्यक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT