Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतही हलका ते मध्यम पाऊस

Latest Rain News ; गेल्या २४ तासांत परभणी जिल्ह्यात सरासरी ११ मिलीमीटर, तर हिंगोली जिल्ह्यात सरासरी २०.१ मिलीमीटर पाऊस झाला.

Team Agrowon

Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यांत सलग तिसऱ्या दिवशी शनिवारी (ता.९) सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासांमध्ये ८२ मंडलांत हलका ते मध्यम पाऊस झाला. गेल्या २४ तासांत परभणी जिल्ह्यात सरासरी ११ मिलीमीटर, तर हिंगोली जिल्ह्यात सरासरी २०.१ मिलीमीटर पाऊस झाला. गेल्या तीन दिवसांतील पावसामुळे खरीप पिकांना तरारी आली आहे.

परभणी जिल्ह्याती परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पुर्णा तालुक्यांतील ५२ मंडलांत हलका ते मध्यम पाऊस झाला. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ११ मिलीमीटर, तर सप्टेंबर महिन्यात आजवर एकूण सरासरी ४५.८ मिलीमीटर (९०.३ टक्के) पाऊस झाला.

यंदा १ जूनपासून आजवर एकूण सरासरी ३८४.६ मिलीमीटर (५९.८ टक्के) पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यांतील ३० मंडलात हलका ते जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी २०.१ मिलीमीटर, तर सप्टेंबर महिन्यात आजवर एकूण सरासरी ७३.४ मिलीमीटर (१५८.२ टक्के) पाऊस झाला. यंदा १ जूनपासून एकूण सरासरी ५८१.४ मिलीमीटर (८४.६ टक्के) पाऊस झाला.

मंडलनिहाय पाऊस स्थिती (५ मिलीमीटरच्या पुढे)

परभणी जिल्हा ः परभणी १६.८, परभणी ग्रामीण १२, पेडगाव ८.८, जांब १०.३, झरी १५.३, दैठणा ७.८, टाकळी कुंभकर्ण ५.५, जिंतूर १२, सावंगी म्हाळसा १७.८, बामणी २०.५, बोरी १५.८, आडगाव ८.३, चारठाणा १३.३, वाघी धानोरा १८, दूधगाव १५.३, सेलू १४.५, देऊळगाव गात १८, वालूर १७, कुपटा ८.५, चिकलठाणा २२.८, मोरेगाव २८.८, मानवत १२, केकरजवळा १२, ताडबोरगाव ९, रामपुरी ८.५, पाथरी १८, बाभळगाव ९.५, हादगाव १८, कासापुरी ३०, वडगाव १८.३, गंगाखेड ९, महातपुरी ५, माखणी ९.५, राणी सावरगाव ५.५, चाटोरी ११.३, बनवस ६.८, पेठशिवणी ६.८, रावराजूर ६, पूर्णा १८.८, ताडकळस १६.५, कात्नेश्वर ८.८, चुडावा २५.३, कावलगाव १९.३.

हिंगोली जिल्हा ः हिंगोली २४.३, नरसी नामदेव २४, सिरसम २०.३, बासंबा २१, दिग्रस कऱ्हाळे २५.३, माळहिवरा २२, खंबाळा २२, कळमनुरी १८, वाकोडी १३.५, नांदापूर १२.५, डोंगरकडा १४.५, वारंगा २१, वसमत १९, आंबा १७.३, हयातनगर १९, गिरगाव १३.८, हट्टा ७.५, टेंभुर्णी १४, कुरुंदा ८.५, औंढा नागनाथ ८, येळेगाव १२.५, साळणा ८, जवळा बाजार ८, सेनगाव ४०.५, गोरेगाव २५.३, आजेगाव २५.३, साखरा ४२.३, पानकनेरगाव ४०.५, हत्ता ४९.५.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT