Crop Damage
Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : गारपिटीच्या नुकसानीचे तीन तालुक्यांतील पंचनामे प्रगतिपथावर

Team Agrowon

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर : जिल्ह्यात शुक्रवार व शनिवारी झालेल्या वादळी पाऊस व गारपिटीने आठ तालुक्यातील १०४ गावांत तब्बल ३ हजार ४६९ हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. ४ हजार ७६९ शेतकऱ्यांचे नुकसान (Crop damage) झाले आहे.

पपई, केळी, द्राक्षे, ज्वारी, गहू, हरभरा ही पिके हातची गेली आहेत. दरम्यान, सरकारी कर्मचाऱ्यांचा संप असला तरी तलाठी, ग्रामसेवक वगळता कोतवाल, कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्यास सुरवात केली आहे.

तीन तालुक्यातील पंचनामे प्रगतिपथावर आहेत. तर पाच तालुक्यात पंचनामे सुरू असल्याचे माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.


जिल्ह्यात शुक्रवार व शनिवारी झालेल्या वादळी पाउस व गारपिटीचा सर्वाधिक फटका पंढरपूर आणि अक्कलकोट तालुक्याला बसला आहे.

पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर, मुंढेवाडी, कोंडारकी, टाकळी, चळे येथील १ हजार ८५० हेक्टरवरील तर अक्कलकोट तालुक्यातील ३२१ हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. तब्बल २ हजार ४०० शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे.

करमाळा, माळशिरस व अक्कलकोट या तालुक्यातील पंचनामे पूर्णत्वाकडे आले असून  तालुक्यातील पंचनाम्याची कामे सुरू आहेत.

अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी, वागदरी, तडवळ, कडबगाव, गौडगाव, हंजगी, दोड्याळ, किणीवाडी, काझीकणबस, शिरशी, शिरवळ, सदलापूर, किणी, पालापूर, तोरणी, भोसगे, संगोगी, सलगर, गौडगाव खु., बिंजनेर, बबलाद, बोरोटी खु., जकापूर, उडगी, तोळणूर, जेऊर, जेऊरवाडी, जैनापूर, करजगी, हंद्राळ, बावींदगी, नागणसूर, हैद्रा, गुरववाडी, मराठवाडी, हिळ्ळी, आंदेवाडी बु., आंदेवाडी खु., शावळ, कलहिप्परगे या ३८ गावातील ८२९ शेतकऱ्यांच्या ३२१ हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे.

दक्षिण सोलापूर, बार्शी, करमाळा, माळशिरस, मंगळवेढा आणि मोहोळ तालुक्यातही नुकसान झाले आहे. या नुकसानीचा अहवाल कृषी विभागामार्फत शासनाला पाठवून देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी दिली.

तालुकानिहाय नुकसानीची आकडेवारी...


पंढरपूर ६ गावे, २४०० शेतकरी, १८५० हेक्टर
अक्कलकोट ३८ गावे, ८१९ शेतकरी, ३२१.८० हेक्टर


दक्षिण सोलापूर ४ गावे १३२ शेतकरी, ८३ हेक्टर
बार्शी ४ गावे, २३६ शेतकरी, १८० हेक्टर


करमाळा १२ गावे, ३०९ शेतकरी, २१६ हेक्टर
माळशिरस २८ गावे, ७३० शेतकरी, ६२५ हेक्टर


मोहोळ ९ गावे, ७६ शेतकरी, ५८ हेक्टर
मंगळवेढा ३ गावे, ६७  शेतकरी  १३६ हेक्टर क्षेत्र

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT