Calf Health Management: नवजात वासरांचे आरोग्य, वाढ व उत्पादनक्षमता चांगली ठेवण्यात गाईचा चीक अत्यंत महत्त्वाचा असतो. वासरांमध्ये जन्मत: कोणत्याही प्रकारची रोगप्रतिकारशक्ती नसते. त्यामुळं पहिल्या काही तासांत मिळणारा चीक हेच वासरांचे पहिले लसीकरण ठरते. वासरासाठी चीकाचे योग्य व्यवस्थापन केले तर वासराचे आरोग्य चांगले जपता येते. .वासराच्या जन्मानंतर पहिल्या ३-४ दिवसांत गाईच्या स्तनातून येणारे घट्ट, पिवळसर रंगाच्या दूधाला चीक म्हणजेच इंग्रजीत त्याला कोलोस्ट्रम म्हणतात. वासराचा जन्म झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस त्याचे पोट रवंथ करण्यासाठीही तयार झालेले नसते. अशा वेळी वासराला चीक पाजल्यास, ते आतड्यांमध्ये उत्तम प्रकारे शोषले जाते..Dairy Animal : दुभत्या जनावरांसाठी चीक धोकादायक का आहे?.चिकाचे नियोजनवासराला जन्मानंतर शक्यतो एक तासाच्या आत चीक देणे आवश्यक आहे. उशिरा चीक पाजल्यास वासराची अँटीबॉडीज शोषूण घेण्याची क्षमता कमी होत जाते.वासराला दररोज त्याच्या शरीरवजनाच्या सुमारे १० टक्के चीक आवश्यक असतो. जर वासरू २० किलोचे असेल, तर त्याला दिवसाला २ लिटर (२० किलोच्या १० टक्के) चीक देणे आवश्यक आहे.हा चीक दिवसातून विभागून द्यावा. जन्मानंतर पहिल्या काही तासांत १.५ ते २ लिटर आणि नंतर ४ ते ५ तासांनी पुन्हा १ ते १.५ लिटर द्यावा, ज्यामुळे त्याला रोगप्रतिकारशक्ती आणि आवश्यक पोषकतत्वे मिळतात.पहिले तीन दिवस वासराला याच केवळ चीक द्यावा. चौथ्या दिवसापासून हळूहळू दूध आणि स्टार्टर फीड सुरू करावे, जेणेकरून वासरे हळूहळू चाऱ्याकडे वळतील, आणि साधारणपणे ८ आठवड्यांपर्यंत त्यांना पूर्णपणे चाऱ्यावर आणता येते..जास्त चिकामुळे होणारे दुष्परिणामवासराला योग्य प्रमाणात चीक देणे गरजेचे असते अन्यथा जास्त चिकाचे दुष्परिणाम होतात. सहसा शेतकरी वासराला जास्त चीक देतात त्यामुळे वासराला जुलाब व अतिसार होतो. तर बऱ्याचदा वासराला कमी दिला जातो त्यामुळे वासराचे पोट भरत नाही तसेच पोषणही पूर्ण होत नाही. .Diarrhea in Newborns Calf : नवजात वासरांमधील अतिसार लक्षणे, उपचार.चीक देण्याचे महत्त्व१. वासरांची रोगप्रतिकारशक्ती वाढवते२. जुलाब, न्यूमोनिया अशा जिवाणू आणि विषानुजन्य आजारापासून संरक्षण मिळते.३. पचनक्रियेला योग्य सुरुवात मिळते.४. वासरांची शारीरिक वाढ चांगली होते.५. आहारामध्ये प्रथिनांची आणि ऊर्जेची कमतरता भासनार नाही..चीकामधील घटक१. रोगप्रतिकारक घटक- इम्युनोग्लोब्युलिन्स (IgG, IgA, IgM) यामुळे जुलाब, न्यूमोनिया व संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण मिळते.२. प्रथिने- केसिन व व्हे प्रथिने आणि एन्झाइम्स व प्रतिजैविक प्रथिने हे वाढ व पेशी दुरुस्तीसाठी आवश्यक असतात.३. उर्जा घटक४. जीवनसत्त्वे- जीवनसत्त्वांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई चीकातून मिळतात. व्हिटॅमिन ए हे डोळे व प्रतिकारशक्तीसाठी उपयुक्त असते. व्हिटॅमिन डीमुळे हाडांची वाढ होते. तर व्हिटॅमिन ई अँटीऑक्सिडंट असते.५. खनिजे- खनिजांमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, झिंक, आयर्न, सेलेनियम महत्त्वाचे घटक चीकातून मिळतात..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.