Single Women Survey: बुलडाणा जिल्ह्यात सर्व्हेक्षणात ८४,०७५ एकल महिलांची नोंद
Rural Women: बुलडाणा जिल्ह्यातील एकल महिलांची अचूक संख्या समोर यावी व त्यांच्या समस्या प्रभावीपणे सोडवता याव्यात, या उद्देशाने जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात एकूण ८४ हजार ७५ एकल महिला आढळून आल्या असून त्यापैकी ग्रामीण भागात ७२,७३९ तर नगरपालिका व नागरी क्षेत्रात ११,३३६ एकल महिला आहेत.