Crop Damage : पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी : पवार

जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे कापणीला आलेला गहू, हरबरा व इतर रब्बी पिके भूईसपाट होऊन भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Nashik onion News : जिल्ह्यात रविवारी (ता. ५) मध्यरात्रीनंतर वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे कांदा पिकासह (onion Crop) गहू (Wheat), हरभरा (Chana) या रब्बी पिकांचे तसेच द्राक्षबागा व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

त्याअनुषंगाने पावसामुळे शेतपिकांचे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन केली असल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी कळविले.

Crop Damage
Marathwada Rain : पाच जिल्ह्यांत अनेक भागांत अवकाळी पावसाचा दणका

जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे कापणीला आलेला गहू, हरबरा व इतर रब्बी पिके भूईसपाट होऊन भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात दोन दिवसांत बाधित झालेली १९१ गावे व संभाव्य बाधित होणाऱ्‍या गावांमध्ये अंदाजे २६०० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिकांचे व फळबागांचे नुकसान झाल्याने शेतकरी कोंडीत सापडला.

वादळी वारे व अवकाळी पावसामुळे बाधित शेतींचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तत्काळ पंचनामे करावेत. त्याचप्रमाणे कोणीही आपत्तीग्रस्त शासकीय मदतीपासून वंचित राहू नये, याकरिता नुकसानग्रस्तांना आर्थिक मदतीसाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com