Ashadi Wari Agrowon
ताज्या बातम्या

Ashadhi Wari : संतांचे पालखी सोहळे पंढरपूरच्या वेशीवर

राज्याच्या काना कोपऱ्यातून पायी निघालेल्या विविध संतांच्या पालख्या शुक्रवारी (ता. ८) वाखरी मुक्कामी पंढरपूरच्या वेशीवर विसावल्या. आज शनिवारी (ता. ९) त्या पंढरपुरात प्रवेश करणार आहेत.

टीम ॲग्रोवन

पंढरपूर, जि सोलापूर ः

‘जाऊ देवाचिया गावा, घेऊ तेथेची विसावा

देवा सांगू सुख, दुःख, देव निवारिल भूक’,

अशी भावना मनात ठेवत सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी गेल्या २० ते २५ दिवसांपासून संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या प्रमुख पालख्यांसह राज्याच्या काना कोपऱ्यातून पायी निघालेल्या विविध संतांच्या पालख्या शुक्रवारी (ता. ८) वाखरी मुक्कामी पंढरपूरच्या वेशीवर विसावल्या. आज शनिवारी (ता. ९) त्या पंढरपुरात प्रवेश करणार आहेत. (Ashadhi wari)

आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराज, देहूहून संत तुकाराम महाराज, मुक्ताईनगरहून संत मुक्ताई, पैठणहून संत निवृत्तीनाथ त्याशिवाय संत सोपानदेव काका, संत गजानन महाराज हे प्रमुख पालखी सोहळे या यात्रेसाठी पायी चालत येत असतात. त्याशिवाय अन्य पालख्यांचांही समावेश असतो. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून वारी झालेली नाही. यंदा दोन वर्षांतून ही वारी होत असल्याने ‘विठ्ठलाचे दर्शन कधी घेतो,’ अशी अधीरता वारकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यात आता पंढरी अगदीच जवळ आल्याने वारकऱ्यांच्या उत्साहाला पार उधाण आले आहे.

दशमीच्या स्नानासाठी भाविक आतुर

उद्या (ता.१०) आषाढी वारीचा मुख्य सोहळा होत आहे. त्या आधी आदल्या दिवशी दशमीच्या स्नानाला विशेष महत्त्व आहे. आजच्या स्नानासाठी शुक्रवारपासूनच (ता.८) अनेक वारकऱ्यांनी पंढरीत दाखल झाले आहेत. पालखी सोहळ्यासह एसटी बस, रेल्वे आणि खासगी वाहनांद्वारे वारकरी दाखल होत आहेत. पंढरपूरला जोडणाऱ्या सोलापूर, कोल्हापूर, सातारा, पुणे अशा चोहोबाजूंच्या रस्त्याकडून भक्तीचा प्रवाह पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे. शुक्रवारीच पंढरीत सुमारे आठ ते दहा लाख वारकरी आल्याचा अंदाज आहे. क्षणोक्षणी या गर्दीत वाढच होत आहे. दुसरीकडे टाळ-मृदंगाचा गजर आणि ज्ञानोबा-तुकारामाच्या जयघोषाने पंढरी आणि परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे.

दर्शन रांग पोचली दोन किलोमीटरवर

श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून गोपाळपूर रस्त्यावरील पाचव्या पत्राशेडच्याही पुढे पोचली आहे. साधारण दोन किलोमीटरपर्यंत ही रांग आहे. यात्रेचा मुख्य सोहळा दोन दिवसांवर असताना, आतापासूनच या रांगेत सुमारे एक लाख वारकरी रांगेत उभे राहिले आहेत. शुक्रवारी मंदिरात दर्शनासाठी एका वारकऱ्याला १८ ते २० तास लागत होते. तर प्रतिमिनिटाला ३० ते ४० वारकरी दर्शन घेऊन बाहेर पडत असल्याचे चित्र होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT