Ashadhi Wari Agrowon
ताज्या बातम्या

Ashadhi Wari 2023 : संतांचे पालखी सोहळे पंढरपूरच्या वेशीवर

Palkhi Sohala 2023 : आळंदीहून संत ज्ञानेश्‍वर महाराज, देहूहून संत तुकाराम महाराज, मुक्ताईनगरहून संत मुक्ताई, पैठणहून संत निवृत्तिनाथ त्याशिवाय संत सोपानदेवकाका, संत गजानन महाराज हे प्रमुख पालखी सोहळे या यात्रेसाठी पायी चालत येतात.

Team Agrowon

Solapur News : आषाढीच्या आनंद सोहळ्यानिमित्त आपल्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी गेल्या २० ते २५ दिवसांपासून संतशिरोमणी ज्ञानेश्‍वर महाराज आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराज या प्रमुख पालख्यांसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून पायी निघालेल्या विविध संतांच्या पालख्या मंगळवारी (ता.२७) वाखरी मुक्कामी पंढरपूरच्या वेशीवर विसावल्या.

आज (ता. २८) त्या पंढरपुरात प्रवेश करतील. ‘तुका म्हणे धावा, आहे पंढरी विसावा,’ या उक्तीप्रमाणे पंढरी समीप आल्याने विठुरायाच्या दर्शनाने आता विसावा मिळणार असल्याचे भाव वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर उमटले आहेत.

आळंदीहून संत ज्ञानेश्‍वर महाराज, देहूहून संत तुकाराम महाराज, मुक्ताईनगरहून संत मुक्ताई, पैठणहून संत निवृत्तिनाथ त्याशिवाय संत सोपानदेवकाका, संत गजानन महाराज हे प्रमुख पालखी सोहळे या यात्रेसाठी पायी चालत येतात. त्याशिवाय अन्य पालख्यांचाही समावेश असतो. ‘विठ्ठलाचे दर्शन कधी घेतो,’ अशी अधीरता वारकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यात आता पंढरी अगदीच जवळ आल्याने वारकऱ्यांच्या उत्साहाला पार उधाण आले आहे.

गुरुवारी (ता. २९) आषाढी वारीचा मुख्य सोहळा होत आहे. त्या आधी आदल्या दिवशी दशमीच्या स्नानाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे आजच्या स्नानासाठी मंगळवारपासूनच (ता. २७) अनेक वारकऱ्यांनी पंढरीत गर्दी केली आहे. पालखी सोहळ्यासह एस.टी. बस, रेल्वे आणि खासगी वाहनांद्वारे वारकरी दाखल होत आहेत.

पंढरपूरला जोडणाऱ्या सोलापूर, कोल्हापूर, सातारा, पुणे अशा चोहूबाजूंच्या रस्त्यांकडून भक्तीचा प्रवाह पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे. मंगळवारीच पंढरीत सुमारे सात ते आठ लाख वारकरी आल्याचा अंदाज आहे. क्षणोक्षणी या गर्दीत वाढच होत आहे. दुसरीकडे टाळ-मृदंगाचा गजर आणि ज्ञानोबा-तुकारामाच्या जयघोषाने पंढरी आणि परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे.

दर्शनरांग पोहोचली दोन किलोमीटर

श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून गोपाळपूर रस्त्यावरील पाचव्या पत्राशेडच्याही पुढे पोचली आहे. साधारण दोन किलोमीटरपर्यंत ही रांग आहे. यात्रेचा मुख्य सोहळा दोन दिवसांवर असताना आतापासूनच या रांगेत सुमारे एक ते दीड लाख वारकरी उभे राहिले आहेत. मंदिरात दर्शनासाठी एका वारकऱ्याला १५ ते १६ तास लागत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gorakshak Terror: गोरक्षकांच्या दहशतीमुळे हजार कोटींचा फटका?

Kharif Crop Insurance: खरीप पीकविमा अर्जासाठी १४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

US Import Duty: भारतापेक्षा बांगलादेश, पाकिस्तानवर शुल्क कमी

NAFED Onion Procurement: नाफेडचा कांदा खरेदीत ‘एमएसपी’ दाव्याचा संतापजनक प्रकार

Pune Dams: जिल्ह्यातील १९ धरणांतून पाण्याचा विसर्ग

SCROLL FOR NEXT