Rain Agrowon
ताज्या बातम्या

Paddy Farming : चाणजेमध्ये भातशेती पाण्याखाली

Paddy Farming : सिडको अधिकाऱ्यांनी या भातशेतीची पाहणी करून साकवाखाली जमा झालेला गाळ, केरकचरा काढला आहे.

Team Agrowon

Uran News : तालुक्यातील चाणजे येथे सिडकोने बांधलेल्या साकवामध्ये अडकत असलेल्या केरकचऱ्यामुळे शेतीतील पाण्याचा प्रवाह बंद झाला होता. परिणामी, भातशेती पाण्याखाली गेल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

सिडको अधिकाऱ्यांनी या भातशेतीची पाहणी करून साकवाखाली जमा झालेला गाळ, केरकचरा काढला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी भातशेती नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी चाणजे येथील शेतकरी व ग्रामस्थांनी सिडकोकडे केली आहे.

उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील द्रोणागिरी सेक्टर ५९ येथील जागेत सिडकोने साकव बांधला आहे. या साकवामध्ये कचरा आणि गाळ बसत असल्यामुळे पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होत नाही. त्यामुळे चाणजे गावातील शेतात पाणी तुंबले होते.

शेतजमीन पाण्याखाली गेल्याने पेरणी केलेले भातबियाणे आणि काही ठिकाणी उगवलेली कोवळी रोपे कुजून जाण्याची भीती शेतकऱ्यांना होती. मात्र सिडको प्रशासनाने तातडीने त्यावर शेतजमिनीची पाहणी करत साकवाच्या खाली साचलेला केरकचऱ्याचा गाळ काढला आणि पाण्याच्या प्रवाहाचा मार्ग खुला केला. दरम्यान, शेतकऱ्यांनी शेतीच्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी सिडकोकडे केली आहे.

पाणी साठल्यामुळे भातशेती पाण्याखाली गेल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याबाबत बोलताना शेतकऱ्यांनी सांगितले, की साकव बांधल्यामुळे कचरा व गाळ साठल्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

त्यामुळे शासनाने नुकसान भरपाई त्वरित द्यावी, अशी विनंती केली आहे. आधीच शेतकऱ्यांवर सतत संकटे येत आहेत, त्यातच अशा संकटांमुळे शेतकरी त्रस्त झाला आहे, असेही शेतकरी म्हणाले.

चाणजे परिसरातील गाळ काढला आहे. शेतीचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.
- एच. डी. नहाने, कार्यकारी अभियंता, सिडको, द्रोणागिरी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT