Paddy Cultivation
Paddy Cultivation Agrowon
ताज्या बातम्या

Paddy : जुलैच्या पावसामुळे भात लागवडी अंतिम टप्यात

टीम ॲग्रोवन

पुणे : जुलैमध्ये झालेल्या पावसामुळे भात लागवडीला (Paddy Cultivation) चांगलाच वेग आला होता. आता भात लागवडी (Paddy Cultivation In Final Stage) अंतिम टप्यात आल्या असून पुणे जिल्ह्याच्या भात पट्यात (Paddy Belt) सरासरीच्या ५९ हजार ६२७ हेक्टरपैकी ४९ हजार २६४ हेक्टर म्हणजेच ८३ टक्के भाताच्या पुर्नलागवडी (Paddy Replanting) झाल्या आहेत. त्यामुळे येत्या आठ दिवसांत भात लागवडी उरकण्याची शक्यता आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्यात पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे रखडलेल्या भात लागवडीला वेग आला आहे. उशिरा का होईना पाऊस झाल्याने चिंतेत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून मजुरांच्या टंचाई असताना इर्जिक पद्धतीने अनेक शेतकऱ्यांनी भात लागवडी केल्या आहेत. तर काही शेतकऱ्यांनी मजुरांच्या मदतीने भात लागवडी केल्या आहेत.

जूनच्या सुरूवातीला जिल्ह्याच्या भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव, जुन्नर, पुरंदर, हवेली या तालुक्यांत बऱ्यापैकी पाऊस झाला होता. त्यानंतर शेतकऱ्यांनी भात लागवडीसाठी लगबग सुरू झाली होती. लवकरच चांगला पाऊस होईल म्हणून या आशेने शेतीकामांनी वेग घेतला होता. परंतु काही प्रमाणात भात लागवडी झाल्यानंतर पावसाने दडी मारण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला होता.

जुलै महिना उजाडला तरी पाऊस न झाल्याने यावर्षी भात लागवड होणार की नाही याची चिंता शेतकऱ्यांना भासू लागली होती. मात्र,दोन ते तीन जुलैपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने या भात पट्यातील तालुक्यात

नद्याही दुथडी भरून वाहू लागल्याने धरणातील पाणीपातळीतही वाढ झाली. झालेल्या पावसामुळे भात लागवडीतील अडथळा कमी झाल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा भात लागवडी करण्यास वेगाने सुरुवात केली आहे. पुणे जिल्ह्यातील सात ते आठ तालुके हे भाताचे आगार म्हणून ओळखले जाते. त्यावरच या परिसरातील अनेक कुटुंबे भात शेतीवरच अवलंबून आहेत.

गेल्या वर्षी अतिवृष्टी झाल्याने भात पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. यामुळे आर्थिक प्रश्न उपस्थित राहिला होता. यावर्षी पावसाने रोपवाटिका टाकल्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडला होता. परंतु उशिराने का होईना पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे. हाच पाऊस पाऊस अजून लांबणीवर गेला असता तर भात पिकांचे व रोपांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना होती. परंतु उशिराने मुसळधार झालेल्या पावसामुळे भात उत्पादकांची चिंता कमी झाली आहे.

तालुकानिहाय झालेली भात लागवड, हेक्टरमध्ये

तालुका --- सरासरी क्षेत्र -- भात लागवड -- टक्के

हवेली --- २०६४ --- १६९२ -- ८२

मावळ ---- १२,१२५ --- ९७३० -- ८०

वेल्हे --- ५०१८ --- ४४५२ -- ८९

मुळशी -- ७६६९ -- ६८२५ -- ८९

जुन्नर --- ११,६२९ -- ८४४१ -- ७३

खेड --- ७२८६ -- ६१२४ -- ८४

आंबेगाव -- ५२४२ -- ५७१० -- १०९

भोर -- ७३८३ --- ५८५२ --- ७९

पुरंदर -- १२०८ --- ४३६ -- ३६

एकूण -- ५९,६२७ -- ४९,२६४ --- ८३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain : पूर्व विदर्भाला वादळी वाऱ्यासह पावसाचा दणका

Weather Update : विदर्भात गारपीट, वादळी पावसाचा इशारा

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

SCROLL FOR NEXT