Unseason Rain Agrowon
ताज्या बातम्या

Unseason Rain : वादळी पावसाने घेतले दोनशेवर जनावरांचे बळी

Heavy Rain : बुलढाणा जिल्ह्यात सुमारे दोनशेपेक्षा जास्त जनावरे या काळात दगावल्याची माहिती समोर आली आहे.

Team Agrowon

Buldhana News : बुलडाणा जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांतील मॉन्सूनोत्तर पाऊस व वादळाने पिकांची अतोनात हानी केली आहे. त्यासोबतच जनावरांचेही बळी घेतले. जिल्ह्यात सुमारे दोनशेपेक्षा जास्त जनावरे या काळात दगावल्याची माहिती समोर आली आहे.

सध्याच्या नैसर्गिक संकटात जिल्ह्यात पिकांची अतोनात नासाडी झाली. सुमारे ३६ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान दोन दिवसांत झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. या संकटात जिल्ह्यात २२२ जनावरांचा मृत्यू झाला. यात प्रामुख्याने खामगाव तालुक्यातील विविध गावांत मंगळवार (ता. २८)पर्यंत लहान व मोठी अशी मिळून १८१ जनावरे दगावली.

मेंढ्या, गाय, वासरांचा यात समावेश आहे. सर्वाधिक १४१ मेंढ्या,१४ लहान पाडसे, १८ गायी व ६ वासरे आहेत. पिंपळचोच, टाकळी तलाव, टेंभूर्णा, पिंपरी गवळी, नागझरी, वाकुड, शिराळा, हिवरखेड, नांद्री, चिंचखेड, गणेशपूर, ढोरपगाव, कवडगाव, झोडगाव आदी गावांचा समावेश आहे.

बुलडाणा जिल्ह्यातून अकोला जिल्ह्यात चराईसाठी शेळ्या-मेंढ्या नेलेल्यांनाही फटका बसला. बाळापूर तालुक्यात गायगाव शिवारात वरोडी बु्द्रुक (ता. मोताळा) येथील इसाराम बिचकुले, तान्हाजी गोरे, सोना भिसे, श्यामराव बिचकुले यांच्या मालकीच्या २० मेंढ्या दगावल्या होत्या. जिल्ह्याला सलग अवकाळी पावसाचा फटका बसला. यामध्ये पिकांची अतोनात नासाडी झालेली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paper Leak Scandal: परीक्षा कधी होणार ‘नीट’?

Free School Initiative: ‘स्नेह’ व्हावा वृद्धिंगत

Agri Pump Cable Theft: कृषिपंपांच्या केबल चोरीमुळे पिके धोक्यात

Turmeric Brand Development: ‘हिंगोलीज यलो गोल्ड’ची बाजारपेठेत चमक

Indapur Water Crisis: इंदापूर पाणीप्रश्‍नी कृषिमंत्री भरणे, हर्षवर्धन पाटील यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT