Ova Crop Agrowon
ताज्या बातम्या

Ova Crop : कोरडवाहू भागामध्ये ओवा पीक एक चांगला पर्याय ः डॉ. इंगळे

Ajwain Crop : कोरडवाहू भागामध्ये ओवा हे पीक एक चांगला पर्याय आहे. या पिकाच्या क्षेत्रामध्ये वाढ करण्यासाठी व यातील निर्यातीच्या संधीचा लाभ घेण्‍यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटांच्या माध्यमातून पिकाची लागवड करणे गरजेचे आहे, असे आवाहन ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे यांनी केले.

Team Agrowon

Rainfed Crop : अकोला ः कोरडवाहू भागामध्ये ओवा हे पीक एक चांगला पर्याय आहे. या पिकाच्या क्षेत्रामध्ये वाढ करण्यासाठी व यातील निर्यातीच्या संधीचा लाभ घेण्‍यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटांच्या माध्यमातून पिकाची लागवड करणे गरजेचे आहे, असे आवाहन ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे यांनी केले.

बाळापूर तालुक्यातील कळंबा बुद्रुक येथे ओवा पिकाची शेतीशाळा घेण्यात आली. या वेळी ते बोलत होते. या वेळी मार्गदर्शक म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे मिरची, भाजीपाला, मसालेवर्गीय पीक विभागप्रमुख डॉ. श्याम घावडे, सरपंच गोपाल उगले, कीटकशास्त्रज्ञ डॉ. डी. एस. भड, आत्मा तालुका तंत्र व्यवस्थापक व्ही. एम. शेगोकार, विनायक कदम, विजू भवरे आदी उपस्थित होते.

ओवा पिकाची शेतीशाळेचा घेण्याचा उद्देश हा उत्पादनवाढ, ओव्याचे मूल्यवर्धन करून स्वच्छता, प्रतवारी यांसह आकर्षक पॅकिंग केल्यास उत्तम ब्रँड तयार होऊ शकतो, असेही ते म्हणाले.

डॉ. घावडे यांनी ओवा पिकांकरिता लागणारे हवामान, जमिनीची पूर्वमशागत, वाणाची निवड, लागवडीचे अंतर, बियाण्यांचे प्रमाण, पेरणीची योग्य वेळ याबद्दल माहिती दिली.

यावेळी शेती शाळेमधील ओवा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषिमित्र नितीन उगले,

रोजगार सेवक दिगंबर उगले यांनी शेतीशाळेसाठी पुढाकार घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वरच्या कारभाऱ्यांचा आज होणार फैसला; मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष

Dimbhe Dam Water Leakage: डिंभे धरणातून होतेय पाण्याची गळ

Paddy Farmer Bonus: धान उत्पादकांना हेक्टरी २० हजार बोनस द्या : मुनगंटीवार

Mumbai APMC File Case: मुंबई राष्ट्रीय बाजार समितीत फाइल पळविल्याचा आरोप

Sugarcane Price: साडेपाच हजारांच्या ऊसदराचे गणित साखरेच्या भावावर अवलंबून

SCROLL FOR NEXT