Animal Care Agrowon
ताज्या बातम्या

Animal Care : जनावरांतील अस्थिव्यंगाचे शास्त्रोक्त उपचार व्हावेत

पशुधनातील अस्थिभंगामुळे पशुपालक आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. अस्थिव्यंगाच्या शास्त्रोक्त पृथक्करण आणि शल्यचिकित्सा उपचार पद्धतींमुळे पशुधनाचे आणि शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळता येते.

Team Agrowon

पुणे ः ‘‘पशुधनातील अस्थिभंगामुळे पशुपालक आणि शेतकऱ्यांचे (Farmer) मोठे नुकसान होते. अस्थिव्यंगाच्या शास्त्रोक्त पृथक्करण आणि शल्यचिकित्सा उपचार पद्धतींमुळे पशुधनाचे (Animal) आणि शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळता येते. यासाठी शास्त्रोक्त उपचार व्हावेत,’’ असे मत पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संतोष पांचपोर यांनी व्यक्त केले.

भारतीय पशू चिकित्सा अनुसंधान संस्थेतर्फे पशुधनाचे अस्थिरोग आणि शल्यचिकित्सा’ या विषयावरील पाच दिवसांचे उपचार प्रशिक्षण शिबिर झाले होते. या शिबिरासाठी देशभरातील पशुवैद्यक उपस्थित होते.

डॉ. पांचपोर म्हणाले, ‘‘पशुधनातील अस्थिव्यंगावर ग्रामिण भागात पारंपरिक पद्धतीने उपचार केले जातात. यामध्ये अस्थिव्यंगाचे शास्त्रोक्त निदान न झाल्यास हा आजार पशुधनामध्ये आयुष्यभर राहतो. त्यामुळे पशुपालकांचे मोठे नुकसान होते. अस्थिव्यंगावर शास्त्रोक्त निदान आणि उपचार झाल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळणे शक्य होते. यासाठी शास्त्रीय पद्धतीने शल्यचिकित्सा करून घ्याव्यात.’’

भारतीय पशू चिकित्सा अनुसंधान संस्थेचे पुणे केंद्राचे शल्यचिकित्सक डॉ. हरिप्रसाद ऐथल यांनी प्रशिक्षणार्थींना गुंतागुंतीच्या शल्यचिकित्सेचे प्रशिक्षण दिले. अस्थिभंगाचा इलाज, विविध प्रकारचे थेअरी आणि प्रॅक्टिकल्सचा त्यात समावेश होता. पशूंमध्ये होणारे विभिन्न प्रकारचे फ्रॅक्चर्स, त्याच्यासाठी काढावे लागणारे एक्स-रे, अस्थिभंगाच्या इलाजासाठी असणाऱ्या प्रगत पद्धती, विभिन्न प्रकारचे धातूचे खिळे आणि पट्टी वापरून करावयाचे उपचार, हाडाचे कलम करून उतींचे निर्माण करणे, जॉईंटमधील फ्रॅक्चर्सचे उपचार करणे, अस्थिभंगाचा उपचार करताना येणाऱ्या अडचणी आणि त्यांचे निदान करणे असे सर्व प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले.

पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे, व्हेटर्नरी पॉली-क्लिनिक औंध येथील पशुधन अधिकारी डॉ. विलास शेरखाने, डॉ. अमोघ थेऊरकर यांनी प्रशिक्षण दिले. डॉ. समीर कुमार दास, डॉ. संघरत्न बहिरे, डॉ. अमोल भालेराव, मनीषा नाईकवाडे यांनी आयोजन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tree Plantation: नाशिकमध्ये एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प

Power Supply Issue: वीज कपातीमुळे पिके धोक्यात; संतप्त शेतकऱ्यांचा महावितरणवर धडक मोर्चा

Farm Loan Waiver: कर्जमाफीसाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक

Crop Damage Compensation: कोकणातील १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना दिलासा; २०९ कोटी मदत मंजूर, शासन निर्णय जारी

Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT