Sugarcane Crushing Season Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane season : बेळगावमधील कारखाने १ नोव्हेंबरनंतर सुरू करा ; कर्नाटकच्या औद्योगिक सचिवांचे आदेश

sugarcane Crushing Season : बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखाने १ नोव्हेंबरनंतरच सुरू करण्याचे आदेश कर्नाटक राज्याचे व्यापार व औद्योगिक विभागाचे सचिव डॉ. रिचर्ड डिसोजा यांनी बेळगावचे जिल्हाधिकारी नीतेश पाटील यांना दिले आहेत.

Team Agrowon

Karnataka news : यावर्षी पावसाअभावी उसाचे उत्पादन कमी होण्याचा धोका असल्याने बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखाने १ नोव्हेंबरनंतरच सुरू करण्याचे आदेश कर्नाटक राज्याचे व्यापार व औद्योगिक विभागाचे सचिव डॉ. रिचर्ड डिसोजा यांनी बेळगावचे जिल्हाधिकारी नीतेश पाटील यांना दिले आहेत. १ नोव्हेंबरपूर्वी हंगाम सुरू करणाऱ्या उत्तर भागातील कारखान्यांवर कारवाईची सूचनाही डॉ. डिसोजा यांनी या आदेशात केली आहे.

कर्नाटकातील साखर कारखाने दरवर्षी आपल्या मर्जीनुसार हंगाम सुरू करतात. विशेषतः उत्तर कर्नाटकातील कारखाने नोव्हेंबरपूर्वी सुरू करण्याची प्रथा आहे. काही कारखाने ऊस नेण्यासाठी स्पर्धा करतात. त्यातून अपरिपक्व ऊस गाळप केला जातो. त्याचा परिणाम साखर उताऱ्यासह उपपदार्थ उत्पादनावर होतो. उत्तर कर्नाटकातील कारखाने लवकर सुरू झाल्यास, असे कारखाने अन्य कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस अनाधिकृतपणे व बेकायदा गाळप करतात. त्यातून वादविवाद व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होतो. याचा विचार करून कारखान्यांनी १ ते १५ नोव्हेंबर याच कालावधीत हंगामाला सुरुवात करायची आहे, असे या आदेशात म्हटले आहे.

कर्नाटकच्या मंत्री समितीच्या ८ जुलै रोजी झालेल्या बैठकीत तशा सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर राज्याच्या साखर आयुक्तांनी ११ ऑगस्ट रोजी पत्र पाठवून उत्तर कर्नाटकातील साखर कारखान्यांना तशा सूचना दिल्या आहेत. यावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत १२ सप्टेंबर व १३ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीतही यावर चर्चा झाली आहे. या सर्व बाबींचा विचार करून उत्तर कर्नाटकातील साखर कारखाने १ नोव्हेंबरपूर्वी सुरू होणार नाहीत, जे कारखाने तत्पूर्वी सुरू होतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई जिल्हाधिकारी यांनी करावी, असेही या पत्रात डॉ. डिसोजा यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT