Orange Processing Agrowon
ताज्या बातम्या

Orange Processing : संत्रा प्रक्रिया केंद्राच्या घोषणेचे उत्पादकांकडून स्वागत

पश्‍चिम विदर्भात बुलडाणा जिल्ह्यात आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र उभारले जाणार असल्‍याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर जिल्ह्यातील उत्पादकांमधून स्वागत केले जात आहे.

Team Agrowon

Orange Market Update बुलडाणा ः पश्‍चिम विदर्भात बुलडाणा जिल्ह्यात आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र (Orange Processing Center) उभारले जाणार असल्‍याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांनी केल्यानंतर जिल्ह्यातील उत्पादकांमधून स्वागत केले जात आहे.

या प्रक्रिया केंद्रासाठी शासनाने तरतूदही जाहीर केली. त्यानंतर आता प्रत्यक्षात काम तातडीने सुरू करण्याच्या हालचाली व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात संत्र्याचे क्षेत्र सध्या ४ हजार हेक्टरपेक्षा अधिक झालेले आहे. दरवर्षी संत्रा बागांची संख्या वाढती आहे. दळणवळणाच्या सोयी वाढत चालल्याने वाहतुकीला फायदा होत आहे.

शिवाय पारंपरिक पिकांपेक्षा हे पीक अधिक पैसे मिळवून देत असल्याने शेतकऱ्यांचा कल निर्माण झाला. त्यातच आता जिल्ह्यात प्रक्रिया उद्योगाची पायाभरणी करण्याचीही घोषणा झाल्याने संत्रा उत्पादकांमध्ये आनंद व्यक्त होऊ लागला आहे.

काही दिवसांपूर्वी संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मूल्यवर्धनासाठी प्रक्रिया उद्योगाची मागणी केली होती. त्यानंतर आता ही मागणी प्रत्यक्षात आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले.

जिल्ह्यात संग्रामपूर, जळगाव जामोद, मेहकर, लोणार, सिंदखेडराजा, चिखली आदी तालुक्यांमध्ये संत्रा बागा आहेत. त्यात सर्वाधिक लागवड ही संग्रामपूर व जळगाव जामोद या तालुक्यांत आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी संत्र्याची लागवड अधिक आहे.

त्यामुळे हा प्रक्रिया उद्योग याच भागात होणार आहे. प्रक्रिया उद्योगाअभावी आतापर्यंत व्यापाऱ्यांच्या दरांवर शेतकऱ्यांना अवलंबून राहावे लागत होते. अनेक वेळा व्यापारी मनमानी पद्धतीने खरेदी करायचे. हे नुकसान टाळण्यासाठी संत्र्यावर मूल्यवर्धन करण्याची शेतकरी सातत्याने मागणी करीत होते.

प्रकल्प प्रत्यक्षात यावा

जिल्‍ह्यात संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी शासनामार्फत निधीची अशी मागणी करण्यात आली होती. याची दखल घेत फडणवीस यांनी यंदाच्या अर्थसंकल्‍पात बुलडाणा जिल्ह्याला संत्रा प्रकिया प्रकल्प दिला आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात यावा, अशी मागणी व्यक्त केला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manikrao Kokate: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा अडचणीत, २ वर्षांची कारावासाची शिक्षा कायम, प्रकरण काय?

Cold Wave: लातुरात वाढला थंडीचा कडाका; तापमान ११ अंशावर

Farmers Crisis: सीनाकाठच्या शेतकऱ्यांकडे कारखानदारांची पाठ

PMFME Scheme: ‘पीएमएफएमई’ योजनेत अन्नप्रक्रिया उद्योगासाठी पुढे या

Gopinath Munde Farmer Accident Scheme: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना पूर्णपणे डिजिटल; महाडीबीटीवरून थेट मदत मिळणार

SCROLL FOR NEXT