Sweet Orange  Agrowon
ताज्या बातम्या

Orange Fruit Fall : संत्रा बागायतदारांना भरपाई न दिल्यास उपोषणाचा इशारा

गेल्या काही वर्षांपासून वातावरणातील बदलाचा मोठा फटका संत्रा बागायतदारांना बसत आहे. या वर्षी देखील मार्च महिन्यापासून तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले. त्यामुळे उन्हाचा तडाखा सहन न झाल्याने बागेतील लहान आकाराच्या फळांची गळ झाली.

टीम ॲग्रोवन

अमरावती : अंजनगावसुर्जी तालुक्यात संततधार पावसामुळे खरिपातील पिकांसोबतच संत्रा बागायतदारांचे मोठे (Orange Crop Damage) नुकसान झाले. त्याची दखल घेत संत्रा उत्पादकांना त्वरित आर्थिक मदत (Financial Relief To Orange Producer) द्यावी, अशी मागणी प्रहार संघटनेने केली. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून ही मागणी करण्यात आली. मागणी मान्य न झाल्यास उपोषणाचा (Hunger Strike) इशाराही दिला आहे.

गेल्या काही वर्षांपासून वातावरणातील बदलाचा मोठा फटका संत्रा बागायतदारांना बसत आहे. या वर्षी देखील मार्च महिन्यापासून तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले. त्यामुळे उन्हाचा तडाखा सहन न झाल्याने बागेतील लहान आकाराच्या फळांची गळ झाली. त्यानंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे देखील फळांची गळ झाली.

राज्याच्या एकूण पाच लाख टन उत्पादनापैकी साडेतीन लाख टन संत्रा बहार गळाला. त्यामुळे संत्रा बागांच्या व्यवस्थापनावर झालेल्या खर्चाची भरपाई बागायतदारांना शक्य होणार नाही. याची दखल घेत शासनाने संत्रा उत्पादकांना देखील भरपाईच्या कक्षेत आणावे. त्यांच्यासाठी आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी प्रहार संघटनेने केली. तहसीलदार अभिजित जगताप यांना निवेदन देण्यात आले. या वेळी प्रहार संघटनेचे युवक आघाडी तालुकाध्यक्ष नीलेश चोपडे, योगेश डोबाळे, भास्कर हुरबडे, अमोल हुरबडे उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT