ताज्या बातम्या

Neera Canal Lining : नीरा डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाला विरोध

ग्रामस्थांनी नीरा डाव्या कालव्याच्या सुरू असलेल्या अस्तरीकरणाच्या कामाला विरोध केला असून, अस्तरीकरणाचे काम बंद न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

टीम ॲग्रोवन

वालचंदनगर, जि. पुणे ः सणसर (ता. इंदापूर) येथील ग्रामस्थांनी नीरा डाव्या कालव्याच्या (Neera Canal) सुरू असलेल्या अस्तरीकरणाच्या कामाला विरोध केला असून, अस्तरीकरणाचे काम बंद न केल्यास तीव्र आंदोलन (Protest) करण्याचा इशारा दिला.

इंदापूर तालुक्यामध्ये नीरा डाव्या कालव्याचे अस्तरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. सणसर-भवानीनगर परिसरामध्ये नीरा डाव्या कालव्याचे अस्तरीकरणाचे काम सुरू आहे. सणसर परिसरातील नागरिकांनी कालव्याच्या कामास विरोध केला आहे.

या संदर्भात सणसर ग्रामपंचायतीमध्ये बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी सरपंच पार्थ निंबाळकर, श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक रणजित निंबाळकर, संचालक दीपक निंबाळकर, अमोल भोईटे, हेमंत निंबाळकर, यशवंत नरुटे, शिवाजी निंबाळकर, मालोजी गायकवाड, परशुराम रायते, नानासाहेब निंबाळकर, आबासाहेब निंबाळकर, विजय भाग्यवंत, जयराम गायकवाड, शैलेश काळे, धनंजय दुबळे, अक्षय निंबाळकर, हरी मोहिते, शब्बीर काझी आदी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये ग्रामस्थांनी कालव्याच्या अस्तरीकरणाच्या कामाला विरोध केला. अस्तरीकरणाचे काम बंद न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. त्यानंतर ग्रामस्थांनी कालव्यावर जाऊन काम बंद पाडले.

येणाऱ्या काळामध्ये कालव्याच्या पाण्याची उपलब्धता कमी होऊ शकते. सिंचनाचे क्षेत्र वाढत असून, दोन आवर्तनांमध्ये अंतरही वाढेल. अस्तरीकरणामुळे दोन आवर्तनांमधील अंतर कमी होणार आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना पाणी देणे शक्य होणार आहे. त्यामुळे कालव्याचे अस्तरीकरणाचे काम होणे गरजेचे आहे.

- आश्विन पवार, सहायक अभियंता, पाटबंधारे विभाग बारामती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

Nashik APMC: नाशिक बाजार समितीचे विभाजन रद्द करा : शिवाजी चुंभळे

Rahul Gandhi: दहा वर्षांत १५२ पेपरफुटीची प्रकरणे, तरीही एकाही दोषीला शिक्षा का नाही? राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Farmers Protest Suspend: देवगावातील ‘सरण आंदोलन’ तात्पुरते स्थगित

SCROLL FOR NEXT