Horticulture  Agrowon
ताज्या बातम्या

Horticulture : फुले, मसाला पिकांसह जुन्या फळबागांच्या पुनरुज्जीवनाची संधी

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान २०२२-२३ अंतर्गत क्षेत्र विस्तार कार्यक्रम फळे, फुले, मसाला लागवड व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन आदींसाठी ‘महाडीबीटी’ या ऑनलाइन प्रणालीवर अर्ज मागविण्यात आले आहेत.

टीम ॲग्रोवन

धुळे ः एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान २०२२-२३ अंतर्गत क्षेत्र विस्तार कार्यक्रम फळे, फुले, मसाला लागवड (Spices Cultivation) व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन आदींसाठी ‘महाडीबीटी’ (MahaDBT) या ऑनलाइन प्रणालीवर अर्ज मागविण्यात आले आहेत. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत (Horticulture) विदेशी फळे, फुले, मसाला लागवड, आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी या फळपिकांच्या जुन्या बागांचे पुनरुज्जीवन समाविष्ट आहे.

अनुदान असे ः घटक- फळे लागवड, कट फ्लॉवर्स, अल्पभूधारक शेतकरी, खर्चमर्यादा एक लाख प्रतिहेक्टर, अनुदान मर्यादा- खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल ४० हजार प्रतिहेक्टर, घटक- इतर शेतकरी, खर्चमर्यादा- एक लाख प्रतिहेक्टर, अनुदान मर्यादा- खर्चाच्या २५ टक्के किंवा कमाल २५ हजार प्रतिहेक्टर, कंदवर्गीय फुले, अल्पभूधारक शेतकरी, खर्चमर्यादा- दीड लाख प्रतिहेक्टर, अनुदान मर्यादा- खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल ६० हजार प्रतिहेक्टर.

घटक- इतर शेतकरी, खर्चमर्यादा- दीड लाख प्रतिहेक्टर, अनुदान मर्यादा- खर्चाच्या २५ टक्के किंवा कमाल ३७ हजार पाचशे प्रतिहेक्टर, घटक- सुटी फुले, अल्पभूधारक शेतकरी, खर्चमर्यादा- ४० हजार प्रतिहेक्टर, अनुदान मर्यादा- खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल १६ हजार प्रतिहेक्टर, घटक- इतर शेतकरी, खर्चमर्यादा- ४० हजार प्रतिहेक्टर, अनुदान मर्यादा- खर्चाच्या २५ टक्के किंवा कमाल १० हजार प्रतिहेक्टर, घटक- मसाला पीकलागवड, बियावर्गीय व कंदवर्गीय मसाला पिके,

खर्चमर्यादा- ३० हजार प्रतिहेक्टर, अनुदान मर्यादा- खर्चाच्या ४० टक्के रक्कम १२ हजार प्रतिहेक्टर, घटक- विदेश फळपीक लागवड, ड्रॅगन फ्रूट, अंजीर व किवी, खर्चमर्यादा- चार लाख प्रतिहेक्टर, अनुदान मर्यादा- खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल एक लाख ६० हजार प्रतिहेक्टर, घटक- पॅशन फ्रूट, ब्लूबेरी, तेंदूफळ व ॲव्हॅकॅडो, खर्चमर्यादा- एक लाख प्रतिहेक्टर, अनुदान मर्यादा- खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल ४० हजार प्रतिहेक्टर, घटक- जन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, खर्चमर्यादा- ४० हजार प्रतिहेक्टर, अनुदान मर्यादा- खर्चाच्या ५० टक्के कमाल २० हजार प्रतिहेक्टर.

योजनेच्या लाभासाठी इच्छुकांनी https://mahadbtmahait.gov.in/farmer/login संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. सातबारा उतारा, ८- अ, आधारकार्ड झेरॉक्स, आधार कार्ड संलग्न बँक पासबुकची झेरॉक्स, संवर्ग (अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती) प्रमाणपत्र झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचा सद्यःस्थितीचा फोटो, हमीपत्र, स्थळपाहणी अहवाल सादर करावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Health: खुरांच्या आरोग्यासाठी जनावरांना द्या संतुलित आहार

Pulse Production: कडधान्य उत्पादन वाढीत बदनापूर केंद्राची महत्त्वाची भूमिका; ठोंबरे 

Beed Farmers: बीडमध्ये ५३ शेतकऱ्‍यांच्या प्रक्षेत्रावर ‘समूहप्रथम दर्शनी’मधून प्रात्यक्षिके

Corona Virus Immunity: विषाणूंना रोखणारी नवी उपचार पद्धती विकसित

Zero Tillage Farming: शून्य मशागत तंत्रातून गवसला यशाचा मार्ग

SCROLL FOR NEXT