Millet Processing Agrowon
ताज्या बातम्या

Millet Processing : तृणधान्य प्रक्रिया उद्योगाला संधी

Millet : पैाष्टिक तृणधान्य आधारित पाककला व त्याच्या उपपदार्थांच्या प्रक्रिया उद्योगामध्ये चांगल्या संधी मिळू शकतात, ग्रामीण भागातील महिलांनी त्यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे आवाहन मोहोळच्या कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. तानाजी वळकुंडे यांनी केले.

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Millet Year : सोलापूर ः पैाष्टिक तृणधान्य आधारित पाककला व त्याच्या उपपदार्थांच्या प्रक्रिया उद्योगामध्ये चांगल्या संधी मिळू शकतात, ग्रामीण भागातील महिलांनी त्यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे आवाहन मोहोळच्या कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. तानाजी वळकुंडे यांनी केले.  

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त मोहोळच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धेचे आयोजन कामती बुद्रुक (ता. मोहोळ) येथे करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. सरपंच अंजली भोसले यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्‌घाटन झाले. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्या बालिका भोसले, कृषी विज्ञान केंद्राचे विशेषज्ञ दिनेश क्षीरसागर, विशेषज्ञा काजल म्हात्रे, विशेषज्ञ डॉ. शरद जाधव, विशेषज्ञ डॉ. पंकज मडावी, राजशेखर सासने, व्यवस्थापक, राजमाता लोकसंचालित साधन केंद्राचे राजशेखर सासणे आदी या वेळी उपस्थित होते.
डॉ. वळकुंडे म्हणाले, की तृणधान्य पौष्टिक आहेत, त्यांचे आहारातील महत्त्व जाणा, केवळ हे वर्ष साजरे करायचे म्हणून नव्हे, तर कायम तृणधान्याचा वापर आहारात वाढवला पाहिजे, असेही ते म्हणाले. याप्रसंगी क्षीरसागर यांनी पौष्टिक तृणधान्यांचे मानवी आहारातील महत्त्व, पौष्टिक पाककला व प्रक्रिया उद्योग या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. सरपंच भोसले यांनीही मनोगत व्यक्त केले. तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या या उपक्रमाचे कौतुक केले. महिला, पालक व महिला बचत गट सदस्यांनी पौष्टिक तृणधान्य आधारित पदार्थांचे सादरीकरण करून सहभाग नोंदविला.

विशेषज्ञ क्षीरसागर यांनी प्रास्ताविकात या पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धा आयोजनाची पार्श्‍वभूमी विषद करून स्पर्धेमध्ये महिलांनी पौष्टिक तृणधान्याचे पारंपरिक व नावीन्यपूर्ण पदार्थ बनवून उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवावा, असे आवाहन केले. सूत्रसंचालन काजल म्हात्रे यांनी तर डॉ. पंकज मडावी यांनी आभार मानले.
विजेत्यांचा बक्षिसासह सन्मान
या स्पर्धेमध्ये नावीन्यपूर्ण नाचणी केक बनविणाऱ्या गायत्री होमकर यांना प्रथम क्रमांक, बाजरीची बर्फी बनविणाऱ्या पूजा बेसरे यांना द्वितीय क्रमांक, नाचणीचे पौष्टिक लाडू बनविणाऱ्या वनिता पाटील यांना तृतीय क्रमांक, ज्वारीची स्वादिष्ट चकली बनविणाऱ्या सीमा ओहाळे यांना चतुर्थ व ज्वारीचे आप्पे बनविणाऱ्या रब्बाना मोहसीन शेख यांना पाचवा क्रमांक मिळाला. त्यांना पारितोषिक, भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या पाककला स्पर्धेचे परीक्षण अंजली भोसले, डॉ. शरद जाधव, दिनेश क्षीरसागर, काजल म्हात्रे, राजशेखर सासने यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement: ऑनलाइन नोंदणी झाली; पण खरेदी केंद्रे आहेत कुठे?

Farmer ID: सोलापूर जिल्ह्यातील ७८ हजार शेतकऱ्यांचे फार्मर आयडी प्रलंबित

Cotton Harvest: कापूस वेचणीसाठी मजुरांची टंचाई

PM Kisan Yojana: 'या' राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसानचे ९ हजार रुपये मिळणार, जाणून घ्या काय आहे योजना?

Voter List: मतदार यादीतील त्रुटींवर वाद पेटणार? ‘एकगठ्ठा’ हरकतींना निवडणूक आयोगाने घातली बंदी

SCROLL FOR NEXT