Nazare Dam Agrowon
ताज्या बातम्या

Nazre Dam : नाझरे जलाशयात अवघा एक टक्का साठा

Water Crisis : नाझरे जलाशयाची पाणीसाठवणूक क्षमता ७८८ दशलक्ष घनफूट असून, यामध्ये ५८८ उपयुक्त पाणीसाठा, तर २०० दशलक्ष घनफूट मृतपाणीसाठा आहे.

Team Agrowon

Pune News : बारामती आणि पुरंदर तालुक्यांसाठी शेती आणि पिण्याचे पाणी दोन्हींसाठी वरदान असलेल्या नाझरे जलाशयात अवघा १ टक्का उपयुक्त पाणीसाठा असून, ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी हा साठा राखीव ठेवण्यात आला आहे. झपाट्याने घटत चाललेल्या पाणीसाठ्यामुळे शेतकरी चिंतेत असून, दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

नाझरे जलाशयाची पाणीसाठवणूक क्षमता ७८८ दशलक्ष घनफूट असून, यामध्ये ५८८ उपयुक्त पाणीसाठा, तर २०० दशलक्ष घनफूट मृतपाणीसाठा आहे. सध्या उपयुक्त पाणीसाठ्यातील केवळ १ टक्का पाणीसाठा शिल्लक असून, पाणीपुरवठा योजनांसाठी हे पाणी जपून वापरण्याचे आवाहन संबंधित योजना व्यवस्थापक आणि नाझरे सिंचन व्यवस्थापन अधिकारी विश्‍वास पवार यांनी केले आहे.

सध्या शेतीसिंचनाच्या सर्व सिंचनयोजनांचा विद्युतपुरवठा बंद करण्याच्या सूचना नाझरे पाटबंधारे विभागाने विद्युत कंपनीस दिल्या आहेत. सध्या शेतीसाठीचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करून पिण्याच्या पाण्यासाठी जलाशयातील पाणी आरक्षित करण्यात आले आहे. नाझरे जलाशयावर मोरगाव प्रादेशिक योजना, नाझरे व इतर पाच गावे, जेजुरी नगरपालिका, जेजुरी औद्योगिक वसाहत, पारगाव माळशिरस अशा पाच पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत.

या पाच योजनांसाठी ऑगस्टअखेर पाणी पुरेल असे नियोजन करण्यात आले आहे. नाझरे जलाशयावर अवलंबून असलेल्या गावांसाठी जलाशयाशिवाय दुसरी कोणतीही पाणीपुरवठा योजना किंवा मुबलक पाण्याचे माध्यम उपलब्ध नाही. त्यामुळे पाऊस पडून धरण पूर्ण क्षमतेने भरेपर्यंत संबंधित गावांनी पाण्याचा अपव्यय टाळून पाणी गरजेपुरते वापरावे, असे आवाहन नाझरे पाटबंधारे विभाग यांच्याकडून करण्यात आले आहे.

जून महिना सरत आला तरी अद्याप पावसाने हजेरी न लावल्यामुळे एकीकडे शेतकरी यांचे खरीप हंगामातील पेरणीचे गणित कोलमडले आहे, तर दुसरीकडे पावसाअभावी पाणीपुरवठा योजनांसाठी महत्त्वाचा स्रोत असलेले जलाशय, पाणीपुरवठा विहिरी, तलाव कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत.

त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांसाठी पाणी आणि चारा या दोन्ही समस्या शेतकरी यांना भेडसावत आहेत. त्यामुळे चारा पाणी, शेती आणि नियमितच्या गरजा यांचे गणित व चक्र सुरळीत चालण्यासाठी शेतकरी सध्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT