Paddy Harvest Agrowon
ताज्या बातम्या

Paddy Harvesting : सिंधुदुर्गमध्ये पंधरा दिवसांत अवघी ५ टक्के भातकापणी

खरीप हंगामात जिल्ह्यात ६० हजार हेक्टरवर यावर्षी भातपीक लागवड करण्यात आली आहे. विजयादशमीपूर्वीच जिल्ह्यातील सुमारे ५० टक्के भातपीक कापणीयोग्य झाले होते.

टीम ॲग्रोवन

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांत अवघी पाच टक्केच भातकापणी (Paddy Harvesting) झाली आहे. परतीच्या पावसामुळे भातकापणी (Paddy) रखडली होती. परंतु गुरुवारी (ता. २०) पावसाने उघडीप देताच काही शेतकऱ्यांनी कापणीला सुरुवात केली आहे.

खरीप हंगामात जिल्ह्यात ६० हजार हेक्टरवर यावर्षी भातपीक लागवड करण्यात आली आहे. विजयादशमीपूर्वीच जिल्ह्यातील सुमारे ५० टक्के भातपीक कापणीयोग्य झाले होते. शेतकऱ्यांनीदेखील नवरात्रोत्सवानंतर भातकापणीची पूर्वतयारी केली होती. परंतु त्याच वेळी जिल्ह्यात परतीच्या पावसाची झोड सुरू झाली.

सतत परतीचा पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना भातकापणी करता आली नाही. गेले आठ ते दहा दिवस तर परतीच्या पावसाने जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले. अनेक भागांत पावसाचे पाणी भातपिकावरून वाहत होते.

त्यामुळे काही भागांत भाताचे मोठे नुकसान झाले. सद्यःस्थितीत जिल्ह्यातील ८० टक्के भातपीक परिपक्व स्थितीत आले आहे. त्यातील अवघ्या ५ टक्के पिकाची कापणी आतापर्यंत झाली आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांनी भातकापणीला सुरुवात केली आहे.

सकाळपासून शेतकऱ्यांची लगबग शेतमळ्यांमध्ये दिसून येत आहे. पावसाने उघडीप दिली तर भातकापणीला वेग येणार आहे. परिपक्व असलेल्या भातपिकाची कापणी येत्या पाच-सहा दिवसांत झाली नाही तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकरी पाऊस थांबण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Harvesting : भातकापणीच्या कामात बळीराजा व्‍यग्र

Farmer Aid : अहमदपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा

Rain Crop Damage : अतिवृष्टीमुळे भाजीपाला उत्पादक संकटात

ZP Panchayat Samiti Election : कार्यकर्त्यांना संधी मिळणार! जिल्हा परिषदेत ५ आणि पंचायत समितीमध्ये २ स्वीकृत सदस्य नेमणार?

Agriculture Department Land : तासगावातील ‘कृषी’ची जागा द्राक्ष संघास भाडे कराराने द्यावी

SCROLL FOR NEXT