Kharif Sowing  Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Sowing : उमरगा तालुक्यात केवळ ३५ टक्के पेरण्या

Kharif Season 2023 : तब्बल दीड महिना पाऊस गायब झाल्याने खरीप हंगामाच्या पेरण्यांवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

Team Agrowon

अविनाश काळे

Umraga News : तब्बल दीड महिना पाऊस गायब झाल्याने खरीप हंगामाच्या पेरण्यांवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. संपूर्ण मृग नक्षत्र कोरडा गेल्यानंतर आर्द्रा नक्षत्रातील पाऊस काही भागात झाला आणि पेरण्याला सुरुवात झाली. काही मोजक्या गावाच्या शिवारात एकूण साधारणतः ३५ टक्के पेरण्या झाल्या आहेत.

तालुक्यात खरीप पेरणीचे क्षेत्र सर्वाधिक आहे, या हंगामातील पिकाच्या उत्पन्नावर शेतकऱ्यांचे अर्थ गणित अवलंबून असते. मात्र यंदा पावसाच्या दगाफटक्याने पेरण्याचे गणित चुकले आहे. यंदा मोठा अवकाळी पाऊस पडला नाही. रोहिणी नक्षत्र आणि मृग नक्षत्रही कोरडा गेला. आर्द्रा नक्षत्राच्या पावसाची सुरुवात चांगली होती.

मात्र हा पाऊस तालुक्यात सर्वदूर नसल्याने मोजक्याच गावात पेरणीला संधी मिळाली. पुनर्वसू नक्षत्रातील पाऊस काही मोजक्या शिवारात झडतो आहे. त्याचा कोवळ्या पिकांना आधार मिळणार आहे.

पण आता गोगलगायींचे विघ्न सुरू झाल्याने कोवळ्या पिकांचे शेंडे कुरतडण्याचा धोका सुरू झाला आहे. कृषी विभागाकडून गोगलगाय नियंत्रणासाठी जनजागृती सुरू आहे. मात्र शेतकऱ्यांसमोर अडचणींचा पाऊस आहे.

पेरण्या रखडल्या...

मुबलक पाऊस होत असल्याने जमिनीत ओलावा निर्माण होत नाही. तालुक्यात सर्वदूर पाऊस नसल्याने पेरण्याच्या टक्केवारीचा अंदाजही येत नाही. मुरूम, उमरगा, मुळज, त्रिकोळी, तलमोड, कदमापूर, तुरोरी, दाळिंब गुंजोटी आदी काही भागांत कमी, अधिक प्रमाणात पेरण्या झाल्या आहेत.

नारंगवाडी भागात आता पेरण्या होतील. सध्या नुसते ढगाळ वातावरण आणि फक्त काही क्षणापुरता रिमझिम पाऊस होत आहे. एकंदरीत दोन, चार किलोमीटर अंतरावर पावसाचे प्रमाण कमी अधिक असल्याने संभ्रमातील शेतकऱ्यांची पेरणी करण्याची मानसिकता दिसत नाही. दरम्यान, तालुक्यात खरिपाचे ७९ हजार हेक्टर क्षेत्र आहे, त्यापैकी साधारणतः ३० हजार हेक्टर क्षेत्रात (अंदाजे ३५ टक्के) पेरणी झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Subsidy: खोडवा उसातील पाचट शेतीसाठी खते, औषधांसाठी ५० टक्के अनुदान

Sesame Production: खानदेशात तीळ उत्पादन कमी

Farmer Participation: धोरणात्मक निर्णयात हवा शेतकऱ्यांचा सहभाग

National Education Policy 2020: कोणत्याही भाषेची जबरदस्ती नाही

Paddy Harvesting: भात कापणीसाठी यांत्रिकीकरणाकडे कल

SCROLL FOR NEXT