Rabi Sowing Agrowon
ताज्या बातम्या

Rabi Sowing : नांदेडमध्ये रब्बीत केवळ १८ टक्केच पीकपेरा नोंद

ई-पीकपाहणी मोहिमेतर्गत जिल्ह्यात १८ टक्क्यांनुसार केवळ दीड लाख हेक्टरवरील पिकांचा पेरा नोंदविल्याची माहिती महसूल यंत्रणेकडून मिळाली.

Team Agrowon

Rabi Sowing नांदेड : ई-पीकपाहणी मोहिमेतर्गत (E Peek Pahani) जिल्ह्यात १८ टक्क्यांनुसार केवळ दीड लाख हेक्टरवरील पिकांचा पेरा (Crop Regiistration) नोंदविल्याची माहिती महसूल यंत्रणेकडून मिळाली.

परंतु शेतकऱ्यांनी पेरा नोंदवूनही त्याची नोंद सातबारा होत नसल्याचा प्रकारही समोर आला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पेरा (Sowing) नोंदणीकडे पाठ फिरविली की तांत्रिक घोळ झाला, असा प्रश्‍न पडला आहे.

जिल्ह्यात रब्बीमध्ये तीन लाख ६६ हजार हेक्टर क्षेत्रावर अंतिम पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाकडून शासनाला कळविण्यात आली होती.

यानुसार ई-पीकपाहणी मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात रब्बी पिकांचा पेरा नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले होते. प्रारंभी १५ जानेवारीपर्यंत पेरा नोंदविण्याची मुदत होती.

यानंतर या कामाला दोन वेळा मुदतवाढ देवून १५ फेब्रुवारीपर्यंत पेरा नोंदविण्यात आला. या कालावधीत जिल्ह्यातील एक लाख ४८ हजार २२० हेक्टरवरील पिकांसाठी पेरा नोंदविल्याची माहिती महसूल यंत्रणेकडून देण्यात आली.

महसूल यंत्रणेने रब्बी हंगामामध्ये पेरणी योग्य क्षेत्र आठ लाख दोन हजार २३८ हेक्टर दाखविले आहे.

तर सर्वसाधारण क्षेत्र दोन लाख २४ हजार ६३४ हेक्टर क्षेत्र निश्‍चित केले आहे. यात पेरणी योग्य आठ लाख दोन हजार २३८ हेक्टरच्या तुलनेत पीकपेरा नोंदणी केवळ १८.४८ टक्क्यांनुसार एक लाख ४८ हजार २२० हेक्टरसाठी नोंदल्याचे म्हटले आहे.

दुसरीकडे कृषी विभागाने यंदा तीन लाख ५६ हजार ९२५ हेक्टरवर रब्बीमध्ये पेरा होऊन यात अडीच लाख हेक्टरवर केवळ हरभरा पेरल्याचे अहवालात म्हटले आहे.

यामुळे रब्बीमध्ये पेरा नोंदणीचा घोळात घोळ झाला का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

सातबारावर पेरा नोंद होईना...

जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून शेतकरी रब्बीसाठी ई-पीक मोहिमेअंतर्गत पीकपेऱ्यांची नोंद घेत आहेत. परंतु पेरा नोंदणीनंतरही सातबारावर पेऱ्यांची नोंद येत नसल्याची तक्रार कोलंबी (ता. नायगाव) येथील साहेबराव बन या शेतकऱ्याने केली आहे.

यामुळे प्रत्यक्षात पेरा नोंदवूनही त्याची नोंद सातबारावर झाली नसल्यामुळे पेरा घटल्याचे बोलले जात आहे. असे झाले तर शासकीय केंद्रावर हरभरा विक्रीसाठी शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seafood Export: अमेरिकेच्या आयातशुल्क वाढीचा कोळंबी निर्यातीवर परिणाम, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणेंची माहिती

FSSAI Registration: दूध उत्पादक-विक्रेत्यांना एफएसएसएआय नोंदणी सक्तीची

Unseasonal Rain: माकणी परिसरात पाऊस, गारपीट

Krishi Kumbh Exhibition: ‘कृषिकुंभ’कडे मंत्री, लोकप्रतिनिधींची पाठ

Unseasonal Rain Damage: ‘अवकाळी’ने रब्बी पिकांसह फळबागांना फटका

SCROLL FOR NEXT