E Peek Pahani
E Peek PahaniAgrowon

E Peek Pahani : ई-पीकपेरा नोंदीसाठी आज विशेष मोहीम

रब्बी हंगामासाठी ई-पीकपाहणी मोबाइल ॲपद्वारे पीकपेरा नोंदवण्यासाठी विशेष मोहीम शनिवारी (ता. १४) राबविण्यात येणार आहे.

नांदेड : रब्बी हंगामासाठी (Rabi Season) ई-पीकपाहणी मोबाइल ॲपद्वारे (E Peek Pahani) पीकपेरा नोंदवण्यासाठी (Crop Sowing Registration) विशेष मोहीम शनिवारी (ता. १४) राबविण्यात येणार आहे. यात पिकांच्या अचूक नोंदींचा शेतकऱ्यांना होणार लाभ आहे.

E Peek Pahani
E Peek Pahani : जिल्हाधिकाऱ्यांकडून फाळेगावला पीकपाहणी

क्षेत्रीय स्तरावरून पीक पाहणी रिअल टाइम क्रॉप डाटा’ संकलित होण्याच्या दृष्टीने तसेच ही माहिती (डाटा) संकलन करताना पारदर्शकता आणणे, पीक नोंदणी प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग घेणे, पतपुरवठा सुलभ करणे, पीक विमा आणि पीक पाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ करणे किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी संगती देण्याची सुविधा उपलब्ध करून देणे.

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे शक्य व्हावे या उद्देशाने शेतकऱ्यांनी आपापल्‍या स्मार्ट मोबाइलमध्ये ई-पीक पाहणी अॅप डाऊनलोड करून त्यामध्ये पीक पाहणी नोंदवण्याची नवीन पद्धत शासनाने सुरू केली आहे.

आपल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अॅपद्वारे पीक पेरा नोंदणी करावी यासाठी शनिवारी (ता. १४) जिल्हाभरात ई-पीक पेरा नोंदणीसाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.

ही मोहीम यशस्वी‍ करण्यासाठी तलाठी, कृषी सहायक, पोलिस पाटील, रोजगार सेवक, स्वस्त धान्य दुकानदार, कोतवाल, शेतीमित्र, प्रगतिशील शेतकरी, आपले सरकार केंद्र चालक, संग्राम केंद्र चालक, कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी, तरुण मंडळांचे प्रतिनिधी अशा स्वयंसेवकांच्या सहकार्याने ई-पीक पेरा नोंदवण्याची मोहीम पार पाडण्यात येणार आहे. पात्र शेतकऱ्यांना विविध शेती विकासाच्या योजनांचा लाभ सुलभतेने मिळण्यासाठीई-पीक पेरा नोंद गरजेची आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com