Kharif Sowing Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Sowing : सोलापूर जिल्ह्यात अवघ्या १८ टक्के क्षेत्रावर पेरण्या

Kharif Season 2023 : सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार अधून-मधून सुरु आहे. पण अद्यापही म्हणावा असा जोर त्यात नाही.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार अधून-मधून सुरु आहे. पण अद्यापही म्हणावा असा जोर त्यात नाही. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या फक्त ५४ हजार ५७६ (१८ टक्के) क्षेत्रावरच खरिपाची पेरणी होऊ शकली आहे.

खरीप हंगामाच्या पेरण्यांचा काळ आता शेवटच्या टप्प्यात येत असल्याने या हंगामाविषयी शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. आता आगामी रब्बीवरच भरोसा ठेवण्याची वेळ आली आहे.

यंदा आठ जूनला मृग नक्षत्राचे आगमन झाले तरी उशिरापर्यंत मॉन्सून सक्रिय झाला नाही. जून महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्यात सर्वदूर समाधानकारक पावसाची नोंद झाली नाही.

बार्शीचा काही भाग आणि माळशिरस परिसर सोडला, तर जिल्ह्यात कुठेही पेरणी योग्य पाऊस झाला नाही. अक्कलकोट व मंगळवेढा तालुक्यात काही प्रमाणात झालेल्या अल्पशा पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. गेल्या आठवड्यात दोन-तीन दिवस सर्वदूर भीज पाऊस झाला. पण त्यात जोर नव्हता.

अद्यापही विहिरी, बोअरला पाणीसाठा वाढेल, अशी पावसाची स्थिती नाही. या पावसानंतर जिल्ह्यात काही ठिकाणी तूर, सोयाबीनची पेरणी होत आहे. जिल्ह्याचे खरिपाचे एकूण क्षेत्र २ लाख ८९ हजार ५७० हेक्टर आहे. त्यापैकी ५४ हजार ५७५ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे, सरासरीच्या १८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

तालुकानिहाय झालेली पेरणी

उत्तर सोलापूर- ५७८१ हेक्टर, दक्षिण सोलापूर- १२ हजार ११४ हेक्टर, बार्शी- ११ हजार १७६ हेक्टर, अक्कलकोट- १६ हजार ३०८ हेक्टर, मोहोळ- १४८२ हेक्टर, माढा- ४१५ हेक्टर, करमाळा- १५४४ हेक्टर, पंढरपूर- ५५१ हेक्टर, सांगोला-१४४६ हेक्टर, माळशिरस-१७९७ हेक्टर, मंगळवेढा-१९६० हेक्टर (एकूण ५४ हजार ५७५ हेक्टर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT