Chana Kharedi
Chana Kharedi Agrowon
ताज्या बातम्या

Chana Kharedi : हरभरा नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी अख्खी रात्र काढली जागून

Team Agrowon

अमरावती : शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजना (MSP Scheme) अंतर्गत हरभरा विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी सोमवार (Online registration for sale of chana) (ता. 27) पासुन सुरु होत आहे.परंतू एक दिवस अगोदरच रविवारला (ता.२६) दत्तापुर (धामणगाव) शेतकी खरेदी विक्री सहकारी समितिच्या कार्यालयाबाहेर ऑनलाईन नोंदणीसाठी हरभरा उत्पादक (Chana Producer) शेतकऱ्यांची अर्धा किलोमिटरची रांग लावली होती.दरम्यान शेतकऱ्यांची संपुर्ण रात्र रांगेत जागुन काढली.

हंगाम २०२३ मधील किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हमीभावाने हरभरा (चना) खरेदीसाठी शेतकरी प्रक्रिया सुरू रब्बी हंगाम २०२३ मधील किमान आधारभूत किमत योजने अंतर्गत हमीभावाने हरभरा (चना) खरेदीकरीता केंद्रशासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असून, लवकरात असल्याने २७ फेब्रुवारी पासून शेतकरी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्याबाबत उपसचिव, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई यांनी संदर्भिय पत्रानुसार कळविले आहे.

त्यानूसार २०२३ हंगामात पी.एस.एस. योजने अंतर्गत हरभरा (चना) खरेदी करीता ऑनलाइन शेतकरी नोंद २७ फेब्रुवारी पासून ऑनलाईन नोंदणी दत्तापुर शेतकी सहकारी खरेदी विक्री संस्थने सुरु करावी. असे दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि.

नागपूरतर्फे कळविण्यात आले आहे. परंतू एक दिवस अगोदरच रविवारला (ता.२६) दत्तापुर (धामणगाव) शेतकी खरेदी विक्री सहकारी समितिच्या कार्यालयाबाहेर ऑनलाईन नोंदणीसाठी शेतकऱ्यांची अर्धा किलोमिटरची रांग लागली होती.

किमान शेतीमालाला आधारभूत किंमत मिळावी म्हणून केंद्र सरकारच्या माध्यमातून खरेदी केंद्र ही सुरु केली जातात. हमीभाव केंद्रापेक्षा खुल्या बाजारात हरभऱ्याला कमी दर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव केंद्रावरच विक्री करावी लागणार आहे.

शिवाय भविष्यात उत्पादनात वाढ झाली तर खुल्या बाजारपेठेतील दर आणखी कमी होतील असा अंदाज आहे. त्यामुळे हमीभाव केंद्राकडे शेतकऱ्यांचा कल राहणार आहे.

दरम्यान यंदा हरभऱ्याचे वाढलेले क्षेत्र यातच पोषक वातावरणामुळे वाढत असलेली उत्पादकता यामुळे यंदा जास्त उत्पादन मिळेल असा अंदाज व्यक्त होत आहे.

ही उत्पादनाची चांगली बाजू असली तरी दुसरीकडे बाजारपेठेत हरभऱ्याच्या दरात अद्यापतरी सुधारणा झालेली नाही. सध्या खुल्या बाजारपेठेत हरभऱ्याला कमी दर मिळत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : तुरीचा बाजार तेजीतच; कापूस, सोयाबीन, कांदा, हिरवी मिरचीचे दर काय आहेत?

Women Farmer : '२०२६ जागतिक शेतकरी महिला वर्ष' ; संयुक्त राष्ट्र संघाने केली घोषणा

Water Shortage : दहा लघू तलाव आटले; ८ तलावांतील साठा जोत्याखाली

Poultry Management : कोंबड्यांतील वाढत्या उष्णतेचा ताण कसा कमी करायचा?

Nitrogen Fertilizer : जमिनीतील नत्राच्या ऱ्हासाची कारणे

SCROLL FOR NEXT