Rabi Sowing: पुणे विभागात रब्बी हंगामातील पेरणी ७८ टक्क्यांवर पोहोचली
Rabi Season: पुणे विभागातील अहिल्यानगर, पुणे व सोलापूर जिल्ह्यांत रब्बी हंगामातील पिकांची पेरणी सुरू असून, या भागांत सरासरी क्षेत्राच्या तुलनेत आतापर्यंत ७८ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.