ताज्या बातम्या

Chandwad APMC : चांदवड बाजार समितीत भुसार शेतीमालाचे ऑनलाइन लिलाव

मालविक्रीसाठी वेळ व खर्चात बचत व्हावी, याकरिता बाजार समितीच्या मुख्य आवारात सोमवारी (ता. १०) सकाळी ११ वाजता भुसार शेतीमालाचा लिलाव सुरू होणार आहेत.

टीम ॲग्रोवन

नाशिक : चांदवड कृषी उत्पन्न बाजार (Chandwad Apmc) समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना भुसार मालविक्रीची (Bhusar Agriculture) जवळची सोय उपलब्ध व्हावी, तसेच मालविक्रीसाठी वेळ व खर्चात बचत व्हावी, याकरिता बाजार समितीच्या मुख्य आवारात सोमवारी (ता. १०) सकाळी ११ वाजता भुसार शेतीमालाचा लिलाव सुरू होणार आहेत.

त्या अनुषंगाने बैठक पार पडली. त्यामध्ये मका, सोयाबीन, गहू, बाजरी, मूग, उडीद, हरभरा, तूर आदी शेतीमालाचे लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र शासनाच्या ‘ई-नाम’अंतर्गत ई-लिलावाबाबत चर्चा करण्यात आली.

त्यानुसार योजनेअंतर्गत भुसार शेतीमालाचे प्रायोगिक तत्त्वावर ऑनलाइन लिलाव करण्यात येणार आहेत, अशी माहिती बाजार समितीच्या प्रशासक प्रेरणा रमेश शिवदास यांनी दिली. चांदवड बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात मका, सोयाबीन, बाजरी शेतीमाल काढणीचा हंगाम सुरू झालेला आहे.

शेतकऱ्यांना भुसारमाल विक्रीची जवळची सोय उपलब्ध व्हावी, याकरिता भुसार शेतीमालाचे लिलाव सुरू करण्याबाबत बाजार समितीच्या प्रशासक प्रेरणा शिवदास यांच्या अध्यक्षतेखाली भुसार शेतीमालाचे आडते, खरेदीदार व्यापारी यांची बैठक घेण्यात आली. या वेळी भुसार शेतीमाल व्यापारी गणेश वाघ, मयूर अजमेरे, संतोष जाधव, भूषण पारखे, उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या मागणीनुसार हंगाम सुरू असल्याने वेळीच भांडवल उपलब्ध व्हावे, यासाठी मालविक्रीची रक्कम रोख स्वरूपात अदा करण्यात येणार आहे. सोमवार ते शनिवार दरम्यान सकाळी ११ व दुपारी ४ वाजता लिलाव होणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Forecast: मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा, विदर्भात पावसाचा अंदाज

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT