Online sat bara agrowon
ताज्या बातम्या

Online Property Card : सात-बारा, प्रॉपर्टी कार्ड दुरुस्तीसाठी आता करा ऑनलाईन अर्ज

Collector Kolhapur : सात-बारा, प्रॉपर्टी कार्ड दुरूस्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे नागरिकांची सोय होणार आहे. कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी या निर्णयाला दुजोरा दिला.

Team Agrowon

Maharashtra Land Revenue : सात-बारा, प्रॉपर्टी कार्डमधील चूक दुरुस्ती करण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६७ कलम १५५ चा वापर केला जातो. आता यातील चूक दुरूस्ती करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

याबाबत कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी दुजोरा दिला आहे. १ ऑगस्टपासून त्याची कामकाज सुरू होणार आहे. नागरिकांना अर्जाचे ऑनलाईन ट्रॅकिंग करता येणार आहे. यातून वेळ आणि पैसा वाचेल.

मागच्या कित्येक वर्षांपासून चुकीची दुरुस्ती करण्यासाठी कलम १५५ च्या आदेशानुसार करण्यात येणारे अर्ज तलाठ्यांकडे केले जाता. ते आता महा ई सेवा केंद्रांद्वारे ऑनलाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यातून अर्ज सादर केलेली तारीख आणि वेळ निश्चित होणार आहे. त्यानुसार संबंधितांना या अर्जावर वेळेत निर्णय घ्यावा लागणार आहे. विनाकारण तसेच विशिष्ट हेतूने अर्ज प्रलंबित ठेवण्याचे प्रकार कमी होणार आहेत.

सरकारी काम आणि सहा महिने थांब या पद्धतीने प्रशासकीय यंत्रणेचा कारभार चालतो, अशी टीका केली जाते. कलम १५५ अन्वये एखादी चूक दुरूस्त करायची असेल तर तहसील कार्यालय तसेच नगरभूमापन, उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयातील कामकाज संथगतीने असते.

या दिरंगाईमुळे नागरिकांचा वेळ वाया जातो, तसेच अनेक वेळा नागरिकांची आर्थिक पिळवणूकही होते. आर्थिक तडतोड झाली नाही तर संबंधिताची फाईल बासनात बांधली जाते. त्यातून नागरिकांचे मोठे नुकसान होते.

सात-बारा उताऱ्यावर खरेदी, बक्षीसपत्र, मृत्यूपत्र, दत्तकपत्र, हक्कसोड, वारसा, बोजा नोंद, बोजा कमी आदींद्वारे होणाऱ्या फेरफारनुसार नोंदी केल्या होत असतात. या नोंदींचा अंमल करताना अनेकदा सात-बारा उताऱ्यात चुका होत असतात.

कधी क्षेत्र बदलते, कधी नावे चुकतात, कधी नावाची नोंदच होत नाही, तर काही वेळा असलेले नाव उताऱ्यावरून जाते. अशीच परिस्थिती प्रॉपर्टी कार्डमध्येही होत असते. त्यामुळे यात सुधारणा करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Result 2024 : विधानसभा निवडणूक निकालानंतर काय म्हणतायत राजकीय नेते?

Mahayuti Sarkar Formation Formula : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला?; अजित पवारांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड

Congress On Mahayuti : लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफीसह जनतेला दिलेल्या आश्वासनांची भाजप महायुतीने पुर्तता करावी; काँग्रेसची मागणी

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते पदी अजित पवार 'पुन्हा' ; आमदारांच्या बैठकीत निवड

Soybean Productivity : शासकीय खरेदीसाठी सोयाबीनची उत्पादकता जाहीर

SCROLL FOR NEXT