Maha Online Portal : ‘महाऑनलाईन’चे सर्व्हर जास्त अर्जांमुळे बंद

Maharashtra Government : राज्यात लाखो शेतकऱ्यांची पीकविम्याच्या अर्जांसाठी आणि विद्यार्थ्यांची अकरावीच्या प्रवेशासाठी दाखले काढण्याची धावपळ सुरू आहे.
Setu Office
Setu OfficeAgrowon

Mumbai News : राज्यात लाखो शेतकऱ्यांची पीकविम्याच्या अर्जांसाठी आणि विद्यार्थ्यांची अकरावीच्या प्रवेशासाठी दाखले काढण्याची धावपळ सुरू आहे. मात्र ‘महाऑनलाईन’चा सर्व्हर डाऊन झाला आहे. पुढील दहा दिवस सर्व्हर नीट होण्याची चिन्हे नाहीत. प्रमाणापेक्षा अधिक अर्ज दाखल होत असल्याने सर्व्हर डाऊन झाल्याचे माहिती तंत्रज्ञान विभागाचे म्हणणे आहे.

‘‘सेतू केंद्रांवर होणारी अडचण लक्षात घेऊन राज्य सरकारने दाखले सादर करण्याची मुदत १० जुलैपर्यंत वाढविली आहे. मात्र, शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. येत्या दोन दिवसांत सर्व्हरची क्षमता वाढवून ही अडचणही दूर केली जाईल,’’ अशी माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांनी सांगितले.

Setu Office
Setu Suvidha Kendra : सोलापुरातील सेतू कार्यालय पुन्हा कार्यान्वित होणार

सध्या खरीप हंगाम सुरू असून पीक विमा योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया ऑनलाइन असल्याने सर्व्हर डाऊनमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. तसेच अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू असून विद्यार्थ्यांना निवासाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला असे विविध दाखले मिळविताना अडचणी निर्माण होत आहेत.

Setu Office
Mahaonline Portal : ‘महाऑनलाईन’ संकेतस्थळ बंद

दाखलेच मिळत नसल्याने महाविद्यालयात प्रवेश घेण्याची संधी हुकते की काय, अशी चिंता विद्यार्थ्यांना होती. राज्यातील बहुतांश अर्जप्रक्रिया ऑनलाइन केल्याने अर्जांची संख्या तीनपट वाढल्याचे माहिती तंत्रमान विभागाचे म्हणणे आहे.

त्यामुळे सर्व्हरची गती मंदावली आहे. कुठलाही सर्व्हर बंद नाही, असा दावाही प्रशासनाने केला आहे. पूर्वी ३० सेकंद ते १ मिनिटाला एक दाखला काढणे शक्य होते. मात्र, हाच वेळ आता अर्ध्या तासावर गेला आहे.

महसूल विभाग अनभिज्ञ

राज्यात पेपरलेस काम करण्याबाबत राज्य सरकार आग्रही आहे. पण हा आग्रह नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. शेतकऱ्यांना विविध दाखले आणि प्रमाणपत्रांसाठी सेतू केंद्रांवर जावे लागते.

मात्र, गावातून प्रवास करून मोठ्या गावांमध्ये जाण्या-येण्याचा त्रास, प्रवास खर्चाचा भुर्दंड आणि मशागतीची कामे सोडून सर्व्हर पूर्ववत होण्याची वाट पाहण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसल्याची स्थिती आहे. महसूल विभागाला सर्व्हर डाऊन आहे की सुरू आहे, याची गंधवार्ताही नसल्याची स्थिती आहे.

मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातून सर्व्हरची गती मंदावल्याच्या तक्रारी आल्या आहेत. विद्यार्थी आणि नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी आम्ही सर्व्हरची संख्या वाढवीत आहोत. कुठेही सर्व्हर बंद पडलेला नाही. येत्या दोन दिवसांत हे काम पूर्ण होईल. १० जुलैपर्यंत दाखले सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येईल.
- पराग जैन, प्रधान सचिव, माहिती व तंत्रज्ञान विभाग.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com